नंदुरबारात यंदा केवळ 40 टक्के झाली कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:12 PM2019-02-08T12:12:12+5:302019-02-08T12:12:17+5:30
नंदुरबार : कापूस हंगाम संपण्याच्या मार्गावर असून बाजार समितीच्या खरेदी केंद्रात यंदाच्या हंगामात केवळ 22 हजार क्विंटल कापूस खरेदी ...
नंदुरबार : कापूस हंगाम संपण्याच्या मार्गावर असून बाजार समितीच्या खरेदी केंद्रात यंदाच्या हंगामात केवळ 22 हजार क्विंटल कापूस खरेदी केला गेला आहे. भाव देखील 5,800 पेक्षा अधीक जावू शकले नाहीत. गेल्या पाच वर्षातील यंदा सर्वात कमी आवक आहे. दरम्यान, आणखी किमान 15 दिवस कापूस खरेदी सुरू राहण्याची शक्यता आहे.
यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे खरीपाच्या इतर सर्वच पिकांसोबत कापूस पिकालाही मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र सरासरी 58 हजार हेक्टर असतांना गेल्या पाच वर्षापासून क्षेत्र तब्बल एक लाखाच्या आसपास जात आहे. एकुण खरीप क्षेत्राच्या 40 ते 45 टक्के क्षेत्रावर केवळ कापूस हेच पीक असते. यंदा देखील जवळपास 90 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली होती. परंतु अनियमित आणि अत्यल्प पजर्न्यमान यामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला. कापूस उत्पादन कमी झाले तरी भाव मात्र अपेक्षीत मिळू शकला नाही. आता कापूस हंगाम संपण्याच्या मार्गावर असतांनाही भाव वाढ होत नसल्यामुळे साठवलेला कापूस शेतक:यांना आहे त्या किंमतीत विक्री करून मोकळे व्हावे लागत आहे.
नंदुरबार बाजार समितीतर्फे दरवर्षी पळाशी येथील राजीव सुतगिरणीत कापूस खरेदी केंद्र सुरू केले जाते. तेथे परवानाधारक व्यापारी कापूस खरेदी करीत असतात. यंदा देखील येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. सुरुवातीला ब:यापैकी प्रतिसाद मिळाला, नंतर मात्र आवक जेमतेमच राहू लागली आहे. यंदा केवळ 22 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार वर्षाचा खरेदीचा विचार करता केवळ 40 टक्के खरेदी झाली आहे. 2015-16 मध्ये जवळपास 60 ते 62 हजार क्विंटल, गेल्यावर्षी 36 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला होता. यंदा आणखी 15 दिवस खरेदी गृहीत धरल्यास साधारणत: 24 ते 25 हजार क्विंटलर्पयत खरेदी जाण्याची शक्यता आहे.
भाव देखील असमाधानकारक
कापसाचे भाव यंदा सुरुवातीपासूनच असमाधानकारक राहिले आहेत. सुरुवातीला 5800 रुपये क्विंटल र्पयत भाव गेले होते. आता जास्तीत जास्त 5450 रुपयेर्पयत भाव जात आहेत. शासनाचा हमी भाव देखील तेवढाच आहे.
चांगल्या दर्जाच्या कापसाला 5450 तर कमी प्रतीच्या कापसाला 5350 रुपयांर्पयत भाव दिला जात आहे. खाजगी व्यापारी त्यापेक्षा कमी भावात कापूस खरेदी करीत आहेत.