जिल्ह्यातील 92 गावांमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:14 PM2019-05-28T12:14:06+5:302019-05-28T12:14:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 92 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर केला आह़े कार्यक्रमांतर्गत अक्कलकुवा आणि ...

Bye-election programs in 92 villages of the district | जिल्ह्यातील 92 गावांमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम

जिल्ह्यातील 92 गावांमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 92 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर केला आह़े कार्यक्रमांतर्गत अक्कलकुवा आणि करजई येथे लोकनियुक्त सरपंच तर 90 ठिकाणी सदस्य निवड होणार आह़े    
घोषित करण्यात आलेल्या या कार्यक्रमानुसार 31 मे पासून त्या-त्या तालुक्यांच्या ठिकाणी नियुक्त निवडणूक निर्णय अधिका:याकडे उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येणार आहेत़ 2018 मध्ये निवडणूक झालेल्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये अर्ज दाखल झाल्याने तसेच इतर अपरिहार्य कारणास्तव काही प्रभागात उमेदवार निवड झालेली नव्हती़ या प्रभागांचा कार्यक्रम आयोगाने राबवणे सुरु केले आह़े यांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 92 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका होणार आहेत़ लोकसभा निवडणूकांनंतर तात्त्काळ ग्रामस्तरावर निवडणूक कार्यक्रम लागू झाल्याने ग्रामीण भागात इलेक्शन फिवर कायम राहणार आह़े विशेष म्हणजे यातील बहुतांश ग्रामपंचायती ह्या मोठय़ा लोकसंख्येच्या गावांच्या असल्याने त्याठिकाणी निवडणूकांची रंगत उत्तरोत्तर वाढण्याची शक्यता वर्तवली आह़े कार्यक्रमानुसार लोकनियुक्त सरपंच पदासाठी अक्कलकुवा आणि करजई ता़ शहादा येथे लढती होणार आहेत़ यातील अक्कलकुवा येथील निवडणूक राजकीय पक्ष आणि त्यांच्या पदाधिका:यांसाठी प्रतिष्ठेची असल्याने त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आह़े 
22 मे पासून निवडणूक कार्यक्रम घोषित केलेल्या सर्व 92 ग्रामपंचायतींमध्ये अधिसूचना काढून आचारसंहिता घोषित करण्यात आली आह़े 31 मे पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आह़े 6 जून रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आह़े सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आह़े  7 जून रोजी छाननी पूर्ण करण्यात येऊन 10 जून र्पयत माघारीची मुदत देण्यात आली आह़े ग्रामपंचायतींमध्ये 23 रोजी मतदान होणार आह़े 24 रोजी तालुकास्तरावर मतमोजणी करुन निकालांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े निवडणूक कार्यक्रम राबवण्यासाठी तालुका प्रशासनांकडून निवडणूक निर्णय अधिका:यांची नियुक्ती करुन अर्ज दाखल करण्यासाठी कक्षांचीही निर्मिती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े 
शहादा तालुक्यातील कु:हावद तर्फे सारंगखेडा येथे 2, ओझर्टा, परिवर्धे, बुडीगव्हाण, अलखेड, काकर्दे दिगर, बोराळे येथे 2, पिंप्री, नवानगर येथे तीन, तितरी येथे 3, कमरावद येथे 3, मलोणी येथे 2, कजर्त येथे 2, सावळदा येथे 2, लक्कडकोट 2, करजई येथे 4, उधळोद, गोदीपूर येथे 2, कुढावद, कुसुमवाडा, काथर्दे खुर्दे, तोरखेडा येथे 2, लंगडी भवानी, ब्राrाणपुरी, वडछील येथे 4, टेंभे तर्फे शहादा, त:हाडी तर्फे बोरद, जुनवणे येथे 2, शिरुड दिगर, बुपकरी याठिकाणी प्रत्येकी एक प्रभागात निवडणूक होणार आह़े नंदुरबार तालुक्यातील चाकळे, पावला, निमगाव, कोरीट, कलमाडी, भोणे, उमर्दे खुर्द येथे 2, केसरपाडा, बोराळा येथे 3, करणखेडा, खर्दे खर्द, नळवे खुर्द, धुळवद, वेळावद, बलवंड, जांभीपाडा, गुजरजांबोली, चौपाळे, तळोदा तालुक्यातील कढेल, त:हावद येथे 2, सोमावल खुर्द, पिंपरपाडा, मालदा, प्रतापपूर येथे प्रत्येकी एका प्रभागात निवडणूक होईल़ नवापूर तालुक्यातील निमदर्डा, बिजगाव, खोकसा, लक्कडकोट, वडखुट अक्कलकुवा तालुक्यातील बेडाकुंड, राजमोही 2, आंबाबारी तसेच धडगाव तालुक्यातील चुलवड येथे ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी मतदान प्रक्रिया होणार आह़े यापूर्वी झालेल्या निवडणूक कार्यक्रमात या गावातील बहुतांश जागा बिनविरोध झाल्या होत्या़ परंतू एक किंवा दोन जागांसाठी उमेदवार मिळाले नव्हते यामुळे वर्षभरापासून रिक्त असलेल्या या पदांवर नव्याने सदस्य निवड होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े काही जागा बिनविरोध होण्याचे संकेत आहेत़ 
या निवडणूक कार्यक्रमासाठी सर्व 92 ग्रामपंचायतींच्या मतदारयाद्या अंतिम करण्यात आल्या आहेत़ या याद्यांचे प्रकाशन तालुकास्तरावर झाल्याची माहिती देण्यात आली आह़े प्रभाग आणि गावातील याद्यांनुसार मतदान होणार आह़े उमेदवारांकडून सध्या याद्यांची पडताळणी करण्यात येत आह़े 

Web Title: Bye-election programs in 92 villages of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.