32 ग्रामपंचायतीत रंगणार पोटनिवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:20 PM2018-04-24T13:20:26+5:302018-04-24T13:20:26+5:30
रणधुमाळी : पाच तालुक्यातील रिक्त पदांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 24 : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक व पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर केला आह़े कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 32 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूका होणार असून सदस्यपदाच्या 35 रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आह़े
जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये या निवडणूका होणार असून 27 एप्रिल पासून तालुकास्तरावर निवडणूकीची अधिसूचना काढण्यात येणार आह़े कार्यक्रमात 7 ते 12 मे या काळात नामनिर्देशनपत्रे मागवणे, 14 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे, 16 मे रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेणे तसेच त्याच दिवशी दुपारी 3 वाजेपासून निवडणूक चिन्ह देऊन अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आह़े यानंतर तब्बल 9 दिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू राहणार असून त्या-त्या तालुक्यातील तहसीलदार यांच्या सूचनेनुसार 27 मे रोजी सकाळी 7़30 ते सायंकाळी 5़30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आह़े मतदान प्रक्रियेनंतर अधिका:यांच्या सूचनेनुसार 28 मे रोजी तहसील कार्यालयांच्या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आह़े निकाल तात्काळ जाहिर करण्यात येणार असल्याचे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक कक्षाकडून कळवण्यात आले आह़े जाहिर झालेल्या पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार शहादा तालुक्यातील पाडळदा बुद्रुक, कमरावद, बिलाडी त़सा, बुपकरी, श्रीखेड, भोरटेक, दामळदा, मलोणी, कुढावद, सावळदा, कु:हावद त़सा, ओझर्टा, परिवर्धे, बुडीगव्हाण, अलखेड, काकर्दे दिगर, आकसपूर, शिरूड दिगर या 18 गावांच्या ग्रामंचायतीत पोटनिवडणूक कार्यक्रम राबवला जाईल़
नंदुरबार तालुक्यातील करणखेडा, कोठडे, भोणे, वाघशेपा, धीरजगाव, वावद, नाशिंद़े
तळोदा तालुक्यात कढेल, त:हावद, सोमावल खुर्द़
नवापूर तालुक्यात ढोंग, नानगीपाडा, वडखुट तर अक्कलकुवा तालुक्यातील वाडीबार या एकमेव ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक कार्यक्रम राबवण्यात येणार आह़े
सर्व 32 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक याद्यांची छाननी यापूर्वीच करण्यात आल्याची माहिती आह़े त्या-त्या गावात रंगणा:या प्रभागनिहाय निवडणूकांमुळे गावा-गावातील राजकारण तापणार असल्याचे सांगण्यात येत आह़े शहादा तालुक्यातील सर्वाधिक 18 गावांमध्ये पोटनिवडणूक होणार असल्याने उत्सुकता लागून आह़े