स्थलांतर रोखण्यासाठी योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:51 AM2020-01-28T11:51:39+5:302020-01-28T11:53:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याच्या दुर्गम भागातील स्थलांतर रोखण्यासाठी विविध विभागांनी शासनाच्या विकास योजना प्रभाविपणे राबवाव्या, असे निर्देश ...

Call for effective implementation of a plan to prevent migration | स्थलांतर रोखण्यासाठी योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन

स्थलांतर रोखण्यासाठी योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्याच्या दुर्गम भागातील स्थलांतर रोखण्यासाठी विविध विभागांनी शासनाच्या विकास योजना प्रभाविपणे राबवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले.
अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी व मोलगी येथील विकासकामांची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मोलगी येथील आरोग्य सेवा पोषण व पुनर्वसन केंद्र, ग्रामीण रुग्णालय, सातपुडा सेंद्रीय भगर युनिट व भगदरी येथील जलयुक्त शिवारची कामे, महुफळी अंगणवाडी, बकरी पालन युनिट, सिमेंट बंधारा, फळबाग लागवड, पॉली हाऊस, पशुवैद्यकीय दवाखाना आणि शासकीय आश्रमशाळेच्या वसतीगृहास भेट दिली.
यावेळी दुर्गम डोंगराळ भागात जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन सोलर पंपची व्यवस्था करण्यात यावी. पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्यात यावेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीस प्रोत्साहन देण्यात यावे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड करावी यासाठी माहिती देण्यात यावी. बकरी पालन हा चांगला शेतीजोड व्यवसाय असून असे युनिट शेतकºयांना देण्यात यावे. अपूर्ण विकास कामे तातळीने पुर्ण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकाºयांसमवेत विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ होते.

Web Title: Call for effective implementation of a plan to prevent migration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.