मासेमारीच्या वादातून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:57 AM2019-08-28T11:57:47+5:302019-08-28T11:57:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विरचक प्रकल्पात मासेमारी करण्याच्या वादातून दोन गटात बेदम हाणामारी झाली. त्यात दोनजण जखमी झाले. ...

Calling from fishing tackle | मासेमारीच्या वादातून हाणामारी

मासेमारीच्या वादातून हाणामारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विरचक प्रकल्पात मासेमारी करण्याच्या वादातून दोन गटात बेदम हाणामारी झाली. त्यात दोनजण जखमी झाले. तालुका पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. 
विरचक प्रकल्पात बंधारपाडा येथील गुलाबसिंग हिरामण गावीत व दारासिंग भावराव वळवी हे मासेमारीसाठी येतात. मासेमारीसाठी काठावर येवू नये यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान दोन गटात हाणामारीत झाले. पहिली फिर्याद गुलाबसिंग हिरामण गावीत यांनी दिली. दारासिंग भावराव वळवी, हिरामण रेला वळवी, सुरेश सिमू गावीत, रणजीत दारासिंग वळवी, प्रकाश कातुडय़ा गावीत, वसंत भाऊराव गावीत, मुका जत्रे, मुन्ना सिंगो गावीत, दिपक तात्या गावीत सर्व रा.बंधारपाडा, ता.नंदुरबार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दुसरी फिर्याद दारासिंग भावराव वळवी यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून रवींद्र गावीत, गुलाब गावीत, बालू गावीत, दिलीप गावीत, सचिन ठाकरे, गवारलाल सावळे, विलास गावीत, रुपचंद ठाकरे, सचिन ठाकरे, विनय ठाकरे, सुनिता गावीत, ईलू गावीत, गुंजा गावीत, धनराज वळवी सर्व रा. बंधारपाडा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अमृत भोये व साहेबराव चौरे करीत आहे.     
 

Web Title: Calling from fishing tackle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.