अध्यक्ष व उपाध्यक्षपदांचे दावेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:26 PM2020-01-09T12:26:12+5:302020-01-09T12:26:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेत त्रिशंकु स्थिती असल्याने शिवसेनेच्या पाठींब्यावर सत्तेचे समिकरण अवलंबून असल्याचे प्राथमिक चित्र असल्याने ...

Candidates for President and Vice President | अध्यक्ष व उपाध्यक्षपदांचे दावेदार

अध्यक्ष व उपाध्यक्षपदांचे दावेदार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेत त्रिशंकु स्थिती असल्याने शिवसेनेच्या पाठींब्यावर सत्तेचे समिकरण अवलंबून असल्याचे प्राथमिक चित्र असल्याने असे समिकरण जुळल्यास अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे कुमुदिनी गावीत तर काँग्रेसतर्फे मधुकर उर्फ दिपक नाईक यांची दावेदारी राहू शकते. उपाध्यक्षपदासाठी मात्र अ‍ॅड.राम रघुवंशी यांची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे.
काँग्रेस आणि भाजपला समान जागा मिळाल्या आहेत. भाजपला राष्टÑवादीचा पाठींबा असल्याचा दावा केला जात असला तरी त्यांचे संख्याबळ २६ होते. बहुमतासाठी २९ चा आकडा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेशिवाय कुणाही पक्षाचे सत्तेचे गणित बसू शकत नाही. शिवसेने जर काँग्रेसला पाठींबा दिला तर माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र मधुकर नाईक यांना अध्यक्षपदाची संधी मिळू शकते. जर शिवसेनेने भाजपला पाठींबा दिला तर कुमुदिनी विजयकुमार गावीत यांना अध्यक्षपदाची संधी आहे.

Web Title: Candidates for President and Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.