नागरिकांचा बेफिकीरपणा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:57 AM2020-03-24T11:57:17+5:302020-03-24T11:57:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉक डाऊन असतांना देखील अनेक व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने सोमवारी सकाळी सुरू केली. नागरिकांनी तक्रारी ...

The carelessness of the citizens continues | नागरिकांचा बेफिकीरपणा सुरूच

नागरिकांचा बेफिकीरपणा सुरूच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉक डाऊन असतांना देखील अनेक व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने सोमवारी सकाळी सुरू केली. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर प्रांताधिकारी वसुमना पंत यांच्या उपस्थितीत पथकाने शहरात फिरून संबधितांना तंबी दिली. त्यानंतर जिवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली. दरम्यान, भाजीमार्केटमध्ये सकाळी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
जिल्ह्यात लॉक डाऊन केल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच अनेक भागातील दुकाने बंद झाली होती. परंतु ११ वाजेनंतर काही ठिकाणी परवाणगी नसलेले दुकाने सुरू झाली. अशा ठिकाणी ग्राहक देखील येवू लागले. ही बाब प्रशासनाला कळविल्यानंतर लागलीच प्रांताधिकारी वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह पथकाने बाजारपेठेत धाव घेतली. व्यापाऱ्यांना तंबी दिल्यानंतर लागलीच अशी दुकाने बंद करण्यात आली.
किराणा, भाजीपाला सुरू
लॉक डाऊनमधून जिवनाश्यक वस्तूंना वगळण्यात आल्याने किराणा दुकाने, औषधी दुकाने, दूध विक्रीची दुकाने, दवाखाने, भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने सुरू होती. भाजीपाला वगळता इतर सर्वच ठिकाणी तुरळक गर्दी दिसून येत होती. दुपारी १२ वाजेनंतर नागरिकांनी देखील घराबाहेर पडण्याचा कंटाळा केला. दुपारी साडेपाच वाजता संचारबंदी जाहीर झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी न्यूज चॅनेलवरून सांगताच शहरातील अनेक भागात शुकशुकाट दिसून आला.
ओपीडी सुरू
आयएमए संघटनेच्या अधिनस्त असलेल्या डॉक्टरांनी आपले हॉस्पीटल व दवाखाने सुरू ठेवले होते. ओपीडी नेहमीप्रमाणे सुरू होती. परंतु रुग्णांची संख्या तुरळकच दिसून आली. नियमित रुग्णांनी हॉस्पीटलमध्ये येवू नये दूरध्वनी द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे सल्ला घ्यावा असे आवाहन देखील डॉक्टर असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये भयाचे वातावरण
कोरोना विषाणूमुळे नागरिकांमध्ये भयाचे वातावरण कायम आहे. न्यूज चॅनेल आणि समाज माध्यमांद्वारे येणाºया बातम्यांच्या आधारेच सामान्य नागरिकांना आजाराच्या तीव्रतेविषयी कळत आहे. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी आवाहन करून नागरिकांना घाबरू नये असे आवाहन केले आहे. प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी देखील आवश्यक ती काळजी घेवून आणि प्रशासनाने दिलेल्यावेळोवेळी सुचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
कायदेशीर कारवाई करणार
विनाकारण घराबाहेर पडणारे, प्रशासनाने जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. विनाकारण जिवनावश्यक वस्तूंचा साठा करू नये. आवश्यक तेवढ्याच वस्तू खरेदी कराव्या. व्यावसायिकांनी देखील एका व्यक्तीला मर्यादेपेक्षा अधीक वस्तू देता कामा नये अशा सुचना देखील प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
सॅनीटायझर मिळणे कठीण
औषधी दुकानांवर सॅनिटायझर मिळणे कठीण झाले आहे. बोगस आणि जास्त किंमत लावून सॅनिटायझर विक्री करणाºयांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे. अनेक दुकानांमध्ये सॅनिटायझरचा साठा संपल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना खाली हात परत जावे लागत आहे. अशीच स्थिती मास्कबाबत आहे. बाजारात सोमवारी दुपारपर्यंत साध्या कापडापासूनचा मास्क विक्री होत होते.

क्वॉरंटाईन व्यक्ती बाहेर आल्यास कारवाई
राहत्या घरी क्वॉरंटाईन केलेली व्यक्ती बाहेर पडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल व अशा व्यक्तीला शासकीय क्वॉरंटाईनच्या स्थळी हलविण्यात येईल. आदेशाचे उल्लंघन करणरी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता नुसार शिक्षेस पात्र राहील.
दुकाने, सेवा आस्थापना, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस, व्यायाम शाळा, संग्रहालये बंद राहतील.
४नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुय्यक निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दिले आहेत. आदेशाचा भंग करणाºयाविरुद्ध कार्यवाही केली जाईल.

सुरू राहणार...
मेडीकल दुकाने
दवाखाने, हॉस्पीटल
किराणा दुकाने, दूध विक्री केंद्र
पार्सल देणाºया सर्व मेस
सर्व धान्य वितरण दुकाने
वृत्तपत्र विक्री
पेट्रोलपंप, गॅस वितरण
मोजकीच शासकीय कार्यालये
आरोग्य विभाग
बँका व एटीएम केंद्र
बंद राहणार...
सर्व कापड, भांडी, कॉस्मेटीक, इलेक्ट्रॉनिक विक्रीची दुकाने
बसून खाता येतील अशा सर्व हॉटेल्स, बियरबार, वाईन विक्रीची दुकाने
सण, उत्सव,जत्रा, आठवडे बाजार.
पान टपरी, चहा विक्रीची टपरी
एस.टी.बस, रेल्वे व सर्व प्रकारची खाजगी प्रवासी सेवा
शाळा, महाविद्यालये

Web Title: The carelessness of the citizens continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.