परवाना विना हातगाडीधारक वा:यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:15 PM2019-08-30T12:15:21+5:302019-08-30T12:15:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील किरकोळ व्यवसाय करणा:या हातगाडय़ा व लॉरीधारकांना पालिकेकडून अधिकृत परवाना देण्यात यावा,  अशी मागणी ...

Carriage holder without license: On this | परवाना विना हातगाडीधारक वा:यावर

परवाना विना हातगाडीधारक वा:यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहरातील किरकोळ व्यवसाय करणा:या हातगाडय़ा व लॉरीधारकांना पालिकेकडून अधिकृत परवाना देण्यात यावा,  अशी मागणी नगरसेविकांनी केली आहे. त्यामुळे त्यांना निदान  विविध बँकांकडून कर्ज घेता येईल, असे शंभरावर व्यावसायिक आहेत.
याबाबत पालिकेच्या मुख्याधिका:यांना निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, तळोदा शहरातील बहुसंख्य व्यवसायिक लोटगाडी, टपरी व           खाली बसून भाजीपाला, फळे, चणे-फुटाणे, चहा-नास्ता, खाद्यपदार्थ  असा छोटासा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. परंतु आजच्या या आधुनिक काळात त्यांना हा व्यावसाय करताना कुठलाही आधार नाही, संरक्षण  नाही, उत्पन्नाचे साधन असल्याचा दाखलाही त्यांच्याकडे नाही. सावकाराकडून घेतलेल्या पैशातूनच ते आपला व्यवसाय करीत  आहेत. 
या व्यावसायिकांकडे अधिकृत परवाना नसल्यामुळे त्यांना विविध सरकारी अथवा सहकारी बँकांकडून कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. ते बँकांकडे कर्ज काढण्यासाठी  जातात. तेव्हा त्यांना पालिकेच्या अधिकृत व्यवसायाचा परवानाच विचारला जात असतो. मात्र त्यांच्याकडे परवाण्याचा दाखला नसल्यामुळे ते देऊ शकत नाही. परिणामी त्यांना स्वस्त कर्जापासूनदेखील   वंचित राहावे लागत आहे. छोटाशा व्यवसायामुळे आपल्या मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाचा आर्थिक प्रश्न निर्माण होत असतो.
वास्तविक नगरपालिकेकडून  सदर व्यावसायिकांकडून दैनंदिन भाडे आकारून वसुली केली जात असते. त्यासाठी पालिकेने स्वतंत्र ठेकादेखील दिलेला आहे. तथापि आर्थिक  सहाय करणा:या संस्थांकडून परवाना अभावी आर्थिक सहाय केले जात नसल्याने पालिकेने या व्यावसायिकांना तात्काळ अधिकृत परवाना उलब्ध करुन द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रतोद संजय  माळी, माजी उपनगराध्यक्ष गौरव वाणी, नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय,  कल्पना पाडवी, अनिता परदेशी, संदीप परदेशी, योगेश मराठे आदींनी केली आहे.
 

Web Title: Carriage holder without license: On this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.