रोझवा लघुप्रकल्पातून पाणी जातय वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:40 PM2017-12-25T12:40:23+5:302017-12-25T12:40:29+5:30

Carry water from small scale plants | रोझवा लघुप्रकल्पातून पाणी जातय वाहून

रोझवा लघुप्रकल्पातून पाणी जातय वाहून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पाला लागलेल्या गळतीने यंदाचाही रब्बी हंगाम संकटात सापडला असल्याची माहिती आह़े हजारो लीटर पाणी सांडव्याच्या भिंतींवरुन वाहून जात असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े तरी संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आह़े
तळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पाला लागलेली गळती शेतक:यांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आह़े ‘लोकमत’तर्फे वेळोवेळी याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले आह़े याचाच परिणाम म्हणून संबंधित विभागाने पाटचारी, चॅनल गेटची दुरुस्ती केली होती़ परंतु सांडव्याची दुरुस्ती न झाल्याने पाण्याची गळती सुरुच आह़े सांडव्याची दुरुस्ती झाली नसल्याने परिणामी ‘ऑव्हरफ्लो’ झालेल्या लघुप्रकल्पांमधील पाणी सांडव्याच्या भिंतींमधून वाहून जात आह़े दररोज हजारो लीटर पाणी वाहत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आह़े रोज हजारो लीटर पाणी वाहुन जात असल्याने लघुप्रकल्पामध्ये सध्या निम्मेच पाणीसाठा शिल्लक आह़े त्यामुळे रब्बी हंगाम व उन्हाळी पिकांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आह़े दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शेतक:यांना रब्बी हंगाम गमवावा लागतो की काय? अशी भिती शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े 
दरम्यान, परिसरातील शेतक:यांनी लघुप्रकल्पातील पाणीसाठय़ाचा अंदाज घेऊन गहू, मका सारखे जास्त पाणी लागणारे रब्बी पिक न घेता हरभरा पेरणीला प्राधान्य दिले आह़े जेणेकरुन लघुप्रकल्पातील जलसाठा झपाटय़ाने कमी झाला तरी हरभरा पिकाच्या उत्पन्नावर याचा काही परिणाम होणार नाही असा शेतक:याचा विश्वास आह़े लघुप्रकल्पांमधील पाणी गळतीमुळे शेतक:यांना रब्बी हंगामातील पिक घेतांना व्दिधा मनस्थिती झाली असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़े काही शेतकरी रब्बी पिकही न घेता शेतं गुरांना वैरण म्हणून मका पिक पेरत असल्याचेही चित्र परिसरात दिसून येत आह़े 
पाणीपातळी पुन्हा खोलावणार
रोझवा लघुप्रकल्पाचा जलसाठा कमी होत असल्याने जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ार्पयत उरलासुरला जलसाठा खूपच कमी झाला तर परिसरातील विहिरी, कुपनलिका यांचीही पाणीपातळी लगोलग खालावते असे जाणकार शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे निदान या वर्षी तरी संबंधित विभागाने सांडव्याच्या भिंतींची दुरुस्ती करुन ही गळती कायमची बंद करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े 
 

Web Title: Carry water from small scale plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.