अवैध गुरे वाहूून नेणा:या वाहनाची धडक
By Admin | Published: April 26, 2017 12:01 AM2017-04-26T00:01:57+5:302017-04-26T00:01:57+5:30
नवापूर तालुक्यात थरार : तीन पोलीस कर्मचारी जखमी
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील बोरविहीर गावाजवळ बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणा:या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न करणा:या पोलीस वाहनाला धडक देत वाहनचालक फरार झाला़ मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत़
नवापूर शहरालगत परिसरातून बेकायदेशीररीत्या गुरे वाहून नेली जात असल्याची माहिती नवापूर पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद राजपूत, पोलीस नाईक नरेंद्र नाईक, पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ गोसावी यांचे पथक सोमवारी रात्रीपासून गस्त घालत होत़े मध्यरात्रीनंतर त्यांना एम़एच़10 एक्यू 1430 या वाहनातून गुरे घेऊन जात असल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस पथकाने एमएच 39 ए 263 या पोलीस वाहनातून पाठलाग सुरू केला़ पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून पिकप चालक जहाँगीर ईस्माईल शेख रा़ जनता पार्क नवापूर याने वाहन न थांबवता वेगाने पळवण्यास सुरुवात केली़ मात्र पोलीसांनी बोरविहीर गावात जिल्हा परिषद शाळेजवळ रायपूरबारी रोडजवळ वाहनाला ओव्हरटेक करत वाहन थांबवण्याचे आदेश दिल़े परंतु वाहनचालक जहांगीर शेख याने हे आदेश धुडकावून लावत थेट पोलीस वाहनाला धडक दिली़ या धडकेत वाहनात बसलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद राजपूत, पोलीस नाईक महेंद्र नाईक व पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ गोसावी हे गंभीर जखमी झाल़े या धडकेनंतर वाहनचालक शेख व त्याच्यासोबतचा क्लिनर हे दोघेही घटनास्थळावरून फरार झाल़े धडकेत पोलीस वाहनाचे नुकसान झाले आह़े मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेची माहिती नवापूर पोलीस ठाण्यात कळवण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत व पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली़ यावेळी त्याठिकाणी एक लाख रुपयांच्या पिकप वाहनासह 60 हजार रुपये किमतीच्या सहा जर्सी गायी व एक वासरू जप्त करण्यात आल़े या घटनेमुळे नवापूर शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली आह़े