शासनाच्या अनास्थेमुळे पाणी गेले वाहून : रोझवा लघुसिंचन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:43 PM2018-03-11T12:43:00+5:302018-03-11T12:43:00+5:30

सांडव्याच्या भिंतीला पडले खड्डे

Carrying water due to Anastasia of the Government: Rosewe small irrigation project | शासनाच्या अनास्थेमुळे पाणी गेले वाहून : रोझवा लघुसिंचन प्रकल्प

शासनाच्या अनास्थेमुळे पाणी गेले वाहून : रोझवा लघुसिंचन प्रकल्प

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 11 : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील लघु प्रकल्प शासकीय अनास्थेचा बळी ठरला आह़े दुरूस्तीची गरज असतानाही भिंत दुरूस्त न झाल्याने दोन महिन्यांपूर्वी तुडूंब भरलेला प्रकल्प तळाला गेला आह़े 
सातपुडय़ाच्या पायथ्याशी तळोदा-धडगाव रस्त्यालगत रोझवा लघुसिंचन प्रकल्प आह़े जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे यंदा प्रकल्प तुडूंब भरला होता़ ऑक्टोबरअखेरीर्पयत प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत होत़े मात्र त्यानंतर सातत्याने प्रकल्पातील भिंतीतून पाणी ङिारपत असल्याने जलसाठा कमी झाला आह़े नंदुरबार मध्यम प्रकल्पाच्या अखत्यारितील या प्रकल्पाची डागुडूजी करण्याची तसदीही संबधित विभागाने घेतलेली नसल्याने आदिवासी शेतक:यांच्या हक्काचे पाणी वाहून गेले आह़े हा प्रकार कधी थांबेल, याकडे आता शेतक:यांचे लक्ष लागले आह़े 1़63 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेल्या रोजवा प्रकल्प पावसाळ्याच्या दोन महिन्यातच ओव्हरफ्लो झाला होता़ प्रामुख्याने रोझवा, रांझणीसह लगतच्या 20 गावांची भूजल पातळी वाढवण्यास हा प्रकल्प सहाय्यकारी ठरतो़ गेल्या तीन वर्षापासून या प्रकल्पात निरनिराळ्या दुरूस्त्यांची कामे निघत असल्याने जलसाठय़ावर परिणाम होतो आह़े गेल्या दोन महिन्यांपासून सांडव्याच्या मुख्य भिंतीला मोठमोठी छिद्रे पडली असल्याचे दिसून आले होत़े कालांतराने या छिद्रांमधूून पाणी वाहणे सुरूच राहिल्याने पाणी वाहून गेले आह़े पाणी वाहणे अविरतपणे सुरूच राहिल्याने सांडव्याच्या खालच्याभागात दलदलीसारखा परिसर निर्माण झाल्याचे अनेकांचे म्हणणे आह़े 
गेल्या दोन वर्षात गेट आणि पाटचारीची दुरूस्ती वेळेवर न होऊ शकल्याने प्रकल्पातून पाणी वाहून गेले होत़े तर यावर्षी दगडी भिंतच खड्डेमय झाल्याने समस्या अधिक वाढली आह़े येथील शेतकरी आणि ग्रामस्थ हे वारंवार याबाबत नंदुरबार मध्यम प्रकल्प कार्यालयाकडे संपर्क साधून दुरूस्तीबाबत कळवत आहेत़ ब:याचवेळा यातील अनेकांना संबधित प्रकल्प प्रकाशा बॅरेजचच्या अधिका:यांच्या देखरेखीखाली असल्याचे सांगून टाळले जात असल्याचेही सांगण्यात आले आह़े 
 

Web Title: Carrying water due to Anastasia of the Government: Rosewe small irrigation project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.