परिचर भरतीतील गैरप्रकाराबाबत चौकशीत दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:18 PM2019-01-09T13:18:56+5:302019-01-09T13:19:50+5:30
जिल्हा परिषद : 68 ऐवजी भरली 78 पदे, एकाच घरातील तीन उमेदवारांची निवड?
नंदुरबार : जिल्हा परिषदेत 2006 मध्ये झालेल्या परिचर भरतीबाबत सातत्याने तक्रारी होऊनही त्याबाबत चौकशीला दिरंगाई होत आह़े याबाबत वृत्तपत्रातून केवळ 68 जागांची जाहिरात देण्यात आली असताना प्रत्यक्षात 78 पदे भरल्याची माहिती समोर आल्याने या भरतीबाबत संशयाचे कल्लोळ निर्माण झाले आह़े
नंदुरबार जिल्हा परिषदेत परिचरांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात देण्यात आली होती़ या जाहिरातीनुसार एकूण 68 पदे विविध आरक्षणाचे भरण्यासाठी उमेदवारांचे अर्ज मागविले होत़े त्यासाठी आठ जानेवारी 2006 रोजी लेखी परीक्षा घेऊन 23 व 24 जानेवारीला मुलाखती झाल्या व गुणवत्तेनुसार परिचर वर्ग ड पदाची निवड करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आह़े दरम्यान प्रशासनाने निवड केलेल्या यादीवर व नियुक्तीच्या प्रक्रियेवर तक्रारी करण्यात आल्या असून त्यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकत्र्यानी माहितीही मागवली त्यानुसार प्रत्यक्षात जाहिरातीत जरी 68 पदांचे अर्ज मागवले तरी प्रत्यक्षात मात्र 78 पदे भरण्यात आल्याचे समोर आले आह़े शिवाय एकच पत्ता असलेल्या ठिकाणाचे तीन उमेदवारांची नियुक्तीही त्यात झाल्याचे समोर आले आह़े उमेदवार भरतीची जी यादी देण्यात आली त्यात 74 उमेदवारांची यादी टाईप केलेली व सही शिक्क्यासह आह़े तर चार उमेदवारांची यादी हाताने लिहिलेली आह़े त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते गोविंद बाबुराव मराठे यांनी या भरतीसंदर्भात जावक रजिस्टरमध्ये नियुक्तपत्र पाठवण्याचे नोंद नाही़ भरती संदर्भात शासनाचे कुठलेही आदेश किंवा परवानगी मार्गदर्शन जिल्हा परिषदेने घेतलेले नाही़
या भरतीत एकाच घराचे तीन-तीन उमेदवार भरती झाले आहेत, जिल्हा परिषद कर्मचा:यांच्या नातेवाईकांना नियुक्ती देण्यात आली आहे अशा अनेक हरकती घेत तक्रारी केल्या आहेत़ प्रत्यक्षात मात्र या तक्रारींबाबत चौकशी होत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आह़े त्यामुळे याप्रकरणाची एकदा चौकशी करुन वास्तवस्थिती जिल्हा परिषद प्रशासनाने मांडण्याची गरज आह़े पदांच्या भरतीसंदर्भात आयुक्तांच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका:यांनी उत्तर दिले आह़े त्यात म्हटले आहे की, परिचरांची एकूण 88 पदे रिक्त होती़ त्यानुसार अतीरिक्त संवर्ग, अनुकंपा, ग्रामपंचायत कर्मचारी यासाठी 20 पदे राखीव ठेवून 68 पदे भरण्याची जाहिरात देण्यात आली होती़ त्यानंतर महिला व बालकल्याण विभागास 1 व नवीन 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांना 9 परिचरांची पदे मंजूर झाली़ त्यामुळे पदांच्या संख्येत बदल झाल्याचे दिसून येत़े नस्तीच्या अवलोकनावरुन संभाव्य रिक्तपदे लक्षात घेऊन एकूण 78 पद भरतीस मा़अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता घेऊन भरती करण्यात आल्याचे दिसून येत असे म्हटले आह़े त्यामुळे 10 वाढीव पदांसाठी जाहिरात का देण्यात आली नाही, याबाबत उलटसुलट चर्चा आह़े