मोठे कडवान सरपंचांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द; न्यायालयाचा आदेश
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: April 25, 2023 07:13 PM2023-04-25T19:13:56+5:302023-04-25T19:14:00+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवले होते दाखले
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील मोठे कडवान ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. यामुळे बनावट व खोटे कागदपत्रांच्या आधारे जातीचे दाखले, जात वैधता प्रमाणपत्र बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठे कडवान येथील देवली बंधू वळवी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राप्त केलेले जातीचे दाखले, जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून निवडणुकीत उमेदवारी केली. या निवडणुकीत त्या निवडूनही आल्या होत्या. याबाबत कडवान येथील सखाराम बावा गावित यांनी जिल्हाधिकारी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आलेले दाखले रद्द करून जप्त करण्याचे आदेश दिले.