‘सावधान !’ सोशल मिडियातील कपल चॅलेंजचा होऊ शकतो दुरूपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:44 PM2020-09-30T12:44:20+5:302020-09-30T12:44:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सोशल मिडियात दणक्यात सुरू असलल्या कपल चॅलेंजबद्दल पोलीसांनी शंका उपस्थित केली असून या फोटोंचा ...

‘Caution!’ Couples can challenge the challenge on social media | ‘सावधान !’ सोशल मिडियातील कपल चॅलेंजचा होऊ शकतो दुरूपयोग

‘सावधान !’ सोशल मिडियातील कपल चॅलेंजचा होऊ शकतो दुरूपयोग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सोशल मिडियात दणक्यात सुरू असलल्या कपल चॅलेंजबद्दल पोलीसांनी शंका उपस्थित केली असून या फोटोंचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगा असा इशारा सायबर पोलीसांनी दिला आहे़ नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने याबाबत जिल्ह्यात पत्रक काढून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे़
सध्या फेसबुक, व्हॉट्सअपसह विविध सोशल मिडियात पती-पत्नी तसेच कुटंूबाचे एकत्रित फोटो टाकून कपल चॅलेंज देण्याचे प्रकार सुरू आहेत़ अनेकजण याला प्रतिसाद देत फोटो शेअर करत आहेत़ कमेंट आणि लाईक्स कमावणाऱ्या या फोटोंमुळे इतरांचा उत्साह मिळून चॅलेंज स्विकारले जात आहे़ परंतु अनेक सोशल मिडियावर टाकलेल्या फोटोंचा गैरवापर केला गेल्याचे यापूर्वी दिसून आले आहे़ हे फोटो ‘मॉफिंग’ केले जातात़ अनेकदा या फोटोंचा दुरूपयोग केला गेल्याचे दिसून आले आहे़ अनेकदा असे फोटो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती लागून दुर्देवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांना अशा चॅलेंजवर विश्वास न ठेवता फोटो शेअर करु नये, असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सायबर सेलकडून करण्यात आले आहे़
दरम्यान सोशल मिडियावर किंवा डिपीवर आपले तसेच कुटूंबाचे फोटो लावू नये, त्याचा गैरवापर झाल्यास मनस्ताप वाट्याला येऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी अशा चॅलेंजमध्ये फोटो टाकताना सावधगिरी बाळण्याचा इशाराही पोलीस दल आणि सायबर सेल यांच्याकडून देण्यात आला आहे़ जिल्ह्यातील नागरिक सोशल मिडियात मोठ्या संख्येने फोटो पोस्ट करत असल्याने ही सूचना काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ या सर्व प्रक्रियेवर पोलीस नजर ठेवून आहेत़

Web Title: ‘Caution!’ Couples can challenge the challenge on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.