दहावीचा सीबीएसईचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:09 PM2020-07-16T12:09:24+5:302020-07-16T12:09:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सीबीएसई अभ्यासक्रमाचा इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी दुपारी जाहिर झाला असून, शहादा येथील महावीर स्कूलचा ...

CBSE results for Class X announced | दहावीचा सीबीएसईचा निकाल जाहीर

दहावीचा सीबीएसईचा निकाल जाहीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सीबीएसई अभ्यासक्रमाचा इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी दुपारी जाहिर झाला असून, शहादा येथील महावीर स्कूलचा सिद्धार्थ जोशी हा विद्यार्थी ९७.९३ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आला आहे. तर जिल्ह्यातील चारही शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
सीबीएसई अभ्यासक्रमातील पाच शाळातील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. बुधवारी दुपारी निकाल जाहीर झाला. या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून बाजी मारली. महावीर इंग्लिश मीडियम स्कुलच्या लोकेश संजय पाटील यास गणित विषयात १०० पैकी १०० गुण तसेच ३ विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान (कळ) विषयात १०० पैकी १०० गुण. विविध शाळांना निकाल असा.
महावीर स्कूलचा १०० टक्के निकाल, शहादा
सीबीएसई बोर्डाद्वारा शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत शहादा शहरातील महावीर इंग्लिश मीडियम स्कुलचा १००% निकाल लागला. यंदाही निकालाची  परंपरा कायम राखत परिसरात नावलौकिक मिळविला आहे. परीक्षेत  शाळेतील एकूण १२९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून, त्यातील १८ विद्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले तर ३४ विद्यार्थी ८०% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले. तसेच ३१ विद्यार्थी ७०% पेक्षा जास्त गुण मिळवून यशस्वी झाले. 
यात सिद्धार्थ जोशी (९७.३३%), स्नेहा जैन (९७.१७), आदर्श चौधरी (९६), दुर्वेश पाटील (९४.३३), श्रीरंग सावळे (९४.३३), हर्षवर्धन मोहिते (९३.८३), लोकेश पाटील (९३.८३), साक्षी जैन (९३.६७), उदित जैन (९३.६७), रोहन पाटील (९३.५०), नम्रता जैन (९२.१७), मयूर पाटील (९२), नुपूर चौधरी (९१.६७), ओम निकम (९१.१७), प्राची चौधरी (९०.८३), हर्षित जैन (९०.८३), रिया जैन (९०.६७), समी हसमानी (९०.६७), या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अध्यक्ष रमेशचंद चोरडिया, उपाध्यक्ष विनयजी गांधी, शाळेचे सचिव पारसजी देसर्डा व शाळेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य अनिलजी छाजेड, हेमल गांधी, चंदनमल जैन, समीर जैन तसेच शाळेचे मुख्याधापक ए.एम.पाटील, उपमुख्याधापक किशोर चौधरी तसेच शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पी.जी.पब्लिक स्कूल, नंदुरबार
सीबीएसईचा दहावीचा निकाल बुधवारी जाहिर होताच नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील पी.जी. पब्लिक स्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी ९० टक्केच्यावर गुण प्राप्त केले आहे. यात कृष्णा सूर्यकांत पंजराले (९५.४ टक्के), कृतिका अनिल पाटील (९३.४), मनुदीपक दीपकसिंग गिरासे (९१.६) तर प्रतिक्षा चंद्रकांत धनगर (९०) आली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन पुष्पेंद्र रघुवंशी, सिद्धार्थ रघुवंशी, अ‍ॅड.रूद्रप्रताप रघुवंशी, प्राचार्य आनंद रघुवंशी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
के.आर. पब्लिक स्कूलचा १०० टक्के निकाल
नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के.आर. पब्लिक स्कूलचा १० वीचा निकाल १०० टक्के लागला. यात मयंक पाल, अनस कुरेशी व पंकज वाक्से या तीन विद्यार्थ्यांनी १० वीच्या परीक्षेत १० सीजीपीए असे ग्रेड मिळविले. या वेळी ७५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात उच्च श्रेणीत ४४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत २१ विद्यार्थी तर द्वितीय १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे चेअरमन किशोर वाणी, व्हा.चेअरमन सिद्धार्थ वाणी, प्राचार्या छाया शर्मा, उपप्राचार्य नदीम शेख व शिक्षक, कर्र्मचाºयांनी कौतुक केले.
डी.जी.अग्रवाल स्कूल, चिंचपाडा
चिंचपाडा, ता.नवापूर येथील धर्मीबाई गिगराज अग्रवाल मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम पियुष कुमार घोष (९० टक्के), द्वितीय आदित्य मिथेलेश रोय (८९.४ टक्के) व तृतीय यशराज सतीश घरटे (८३.४) आला. या वेळी ५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष निरंजन अग्रवाल, उपाध्यक्ष, प्राचार्य यांनी कौतुक केले.

Web Title: CBSE results for Class X announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.