सीसीआयची कापूस खरेदी लांबवणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:10 PM2018-10-15T12:10:28+5:302018-10-15T12:10:34+5:30
सहा हजार रुपये भाव जाहिर : पळाशी येथील केंद्रात आजपासून कापूस खरेदी
नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळाशी ता़ नंदुरबार येथील केंद्रावर सोमवारपासून कापूस खरेदीला सुरुवात होणार आह़े याठिकाणी कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रूपये भाव जाहिर करण्यात आला आह़े खरेदीसाठी बाजार समिती आणि परवानाधारक व्यापारी सज्ज झाले असताना कॉटन कार्पोरेशन इंडिया अर्थात सीसीआय हे आठ दिवस उशिराने कापूस खरेदी करणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े
सीसीआयकडून उशिराने कापूस खरेदी सुरु करण्याच्या या निर्णयाला ओल्या कापसाची आवक हे प्रमुख कारण मानले जात असून सीसीआयकडून पूर्णपणे कोरडय़ा झालेल्या कापसाला प्रतिक्विंटल केवळ 5 हजार 450 रूपये प्रतिक्विंटल हमीभाव यंदा जाहिर करण्यात आला आह़े सीसीआयने जाहिर केलेले दर शेतक:यांना नाराज करणारे असले तरी परवानाधारक व्यापा:यांकडून तात्काळ खरेदीकरुन रोख रक्कम देण्याच्या निर्णयामुळे काहीअंशी समाधानाची लहर शेतक:यांमध्ये आह़े यातून कापूस खरेदी केंद्रात पहिल्या दिवसांपासून गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आह़े सीसीआयकडून कापूस खरेदी तात्काळ सुरु करण्याची शेतक:यांची अपेक्षा होती़ परंतू त्यांच्याकडून ओल्या कापसाचे कारण पुढे करत खरेदी उशिराने सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याने शेतक:यांनी नाराजीही व्यक्त केली आह़े जिल्ह्यात यंदा दुष्काळी स्थिती असल्याने कापसाचे मुख्य उत्पादक असलेले नंदुरबार, शहादा आणि तळोदा तालुक्यातील शेतकरी संकटात आहेत़ बरेच शेतकरी अद्यापही परतीच्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत़ परतीच्या पावसामुळे कापूस उत्पादन वाढीची अपेक्षा असल्याने कोरड क्षेत्रातील शेतक:यांकडून किमान महिन्याभरानंतर कापूस बाजारात आणण्याची शक्यता आह़े गेल्यावर्षाप्रमाणे बहुतांश शेतक:यांचे वार्षिक आर्थिक नियोजन हे कापसावर होत़े परंतू गेल्या चार महिन्यात अपेक्षेपेक्षा अल्प पजर्न्याने हजेरी लावल्याने त्यांना नाममात्र उत्पादन शेतक:यांना येण्याची शक्यता आह़े सीसीआयने गेल्यावर्षी कापूस खरेदी केंद्रावर 850 गाठी कापूस खरेदी केला होता़ साधारण चार हजार 250 क्विंटल हा कापूस होता़ तर परवानाधारक व्यापा:यांनी 25 हजार क्ंिवटल कापसाची खरेदी केली होती़
सीसीआयने यंदाच्या वर्षात कापसाला 5 हजार 450 रूपये दर देण्याचा निर्णय जाहिर केला आह़े सोमवारपासून बाजारात येणारा कापूस हा 8 ते 10 टक्के ओलावायुक्त राहण्याची शक्यता असल्याने सीसीआयने खरेदी पुढे ढकलली आह़े परंतू हाच कापूस खाजगी व्यापारी सहा हजार रूपये प्रतिक्विंटल दरात खरेदी करणार आहेत़ विशेष म्हणून हंगामाच्या सुरुवातीला व्यापा:यांकडून 15 टक्क्यांपर्यत ओलावा असलेला कापूसही योग्य त्या दरात खरेदी करण्यात येऊन शेतक:यांची मदत करण्यात येत़े परंतू सीसीआयकडून कोरडय़ाच कापसाची खरेदी करण्याचा हेका धरल्याने शेतकरी अचंबित झाले आहेत़ पुढील सीसीआयची कापूस खरेदीची निश्चित तारीख जाहिर होणार आह़े