सारंगखेडा बॅरेजवर सीसीटीव्ही कॅमेरे
By Admin | Published: February 21, 2017 12:01 AM2017-02-21T00:01:55+5:302017-02-21T00:01:55+5:30
प्रकाशा बॅरेजकडे दुर्लक्ष : आठ महिन्यांपासून पथदिवे बंदच
प्रकाशा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा बॅरेजवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र प्रकाशा बॅरेजच्या सुरक्षेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्षच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
सारंगखेडा बॅरेजवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. 35 लाख 50 हजार रुपये खर्च करण्यात येणार असून त्यात दोन मोठे कॅमेरे (बुलेट) व चार लहान कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. दोन मोठय़ा कॅमे:यांमध्ये दोन किलोमीटर अंतरावरचे दृष्य तर चार लहान कॅमे:यांमध्ये 18 मीटर्पयतचे दृष्य कैद होणार आहे. त्याचा डिस्प्ले कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. तापी जलविद्युत उपसा सिंचन विभागाचे उपअभियंता आर.एस. पाथरीकर यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात काही त्रुटय़ा आढळून आल्यानंतर त्यांची पूर्तता करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या कॅमे:यांची वर्षभर देखभाल व दुरुस्तीचे कामही संबंधित कंपनीकडून करण्यात येणार आहे.
प्रकाशा बॅरेजकडे दुर्लक्षच
सारंगखेडा बॅरेजवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असले तरी प्रकाशा बॅरेजकडे मात्र सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभागाचे दुर्लक्षच आहे. प्रकाशा बॅरेजवरील 78 पथदिवे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असून सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. याकडे अधिका:यांचे दुर्लक्ष असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
(वार्ताहर)
सारंगखेडा येथे 35 लाख 50 हजार रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. त्यात काही तांत्रिक त्रुटय़ा होत्या त्यांची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रकाशा येथील बॅरेजचे 78 पथदिवे बंद असून त्याचाही प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे.
-आर.एस. पाथरीकर,
उपअभियंता, तापी जलविद्युत उपसा सिंचन उपविभाग