सीसीटीव्हीचे जाळे आणखी विस्तारणार : नंदुरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:21 PM2017-12-30T12:21:34+5:302017-12-30T12:21:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात सीसीटीव्ही कॅमे:यांचे जाळे अधिक विस्तारण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडून निधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, सद्यस्थितीत 30 कॅमेरे सुरू असून सध्याचा कंट्रोल रूम हा पोलीस मुख्यालयात स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून नंदुरबार शहर हे शासन दप्तरी संवेदनशील म्हणून नोंद आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमे:यांचीही नजर राहत आहे. त्याचा चांगला परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात शहरात आणखी 100 ते 150 कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरा कंट्रोलरूमचेही स्थलांतर पोलीस मुख्यालयात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सध्याचे कॅमेरे अपुर्ण
सध्या असलेले 30 कॅमेरे पुरेसे नसल्याची स्थिती आहे. असे असले तरी सर्वच मुख्य चौक, मुख्य मार्ग आणि संवेदनशील भागात हे कॅमेरे कार्यान्वीत आहेत. त्याद्वारे नजर ठेवून घडणा:या घटना किंवा घडलेल्या घटनांवर लागलीच नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना वेळोवेळी यश आले आहे. सध्याचे कॅमेरे हे शहरातील मुख्य भागातच असल्यामुळे इतर ठिकाणची स्थितीचे अवलोकन या माध्यमातून होत नाही. ही बाब लक्षात घेता संख्या वाढविण्यात येणार आहे.
विस्तार वाढविणार
सध्या असलेले कॅमेरे हे मुख्य चौक, संवेदनशील चौक, संमिश्र वस्ती आणि मुख्य मार्गावर कार्यान्वीत आहेत. परिणामी शहरातील इतर भागावर नजर ठेवतांना पोलिसांना पेट्रोलिंगसह साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवावी लागते. शिवाय कॉलनी भागात भुरटय़ा चो:यांचे सत्र थांबविण्यात देखील अडचण येते. ही बाब लक्षात घेता आणखी 100 ते 150 कॅॅमेरे लावण्याचे नियोजन पोलीस विभागाचे आहे. त्यासाठी जिल्हाधिका:यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन व विकास समितीकडे देखील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला देखील मंजुरी मिळालेली आहे. लवकरच हे कॅमेरे कार्यान्वीत होतील अशी अपेक्षा आहे.
यापुढे कॅमेरे घेतांना रात्रीच्या वेळ देखील सुस्पष्ट चित्रीकरण होईल या दर्जाचे कॅमेरे घेण्याची अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.
दुरूस्तीसाठी निधी हवा
सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीसाठी डीपीडीसीमार्फत निधी उपलब्ध होतो, परंतु त्यांच्या दुरूस्तीसाठी मात्र निधी राहत नसल्याची स्थिती आहे. नैसर्गिक कारणांमुळे कॅमेरे तुटले किंवा खराब झाले, कुणी मुद्दाम त्यांची तोडफोड केली तर असे कॅमेरे अनेक दिवस दुरूस्त होत नाहीत. परिणामी ते निकामी होतात. त्यामुळे कॅमेरे खरेदी करतांना आणि लावतांना त्यांच्या दुरूस्तीसाठीच्या निधीचीही तरतूद करून ठेवणे आवश्यक आहे.