वरिष्ठ महाविद्यालयात अभियंता दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:37 AM2021-09-16T04:37:56+5:302021-09-16T04:37:56+5:30
ऑनलाइन कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.विश्रामकाका शैक्षणिक संकुलाचे किमान कौशल्य विभागातील प्रा.भरत आर. पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी किमान ...
ऑनलाइन कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.विश्रामकाका शैक्षणिक संकुलाचे किमान कौशल्य विभागातील प्रा.भरत आर. पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी किमान कौशल्य विभागातील प्रा.भरत पाटील, प्रा.एम.आर. पाटील, प्रा.आर.एन. पाटील, प्रा.तुषार पाटील यांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ.शांताराम बडगुजर यांनी आपल्या मनोगतात उपस्थित प्राध्यापक बंधु-भगिनी यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.कैलास चव्हाण, आय.एम.आर.डी.चे प्र.संचालक प्रा.अनिल पाटील आदी मान्यवर म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.दीपक वळवी यांनी करून दिला. सूत्रसंचालन आय.एम.आर.डी.चे प्रा.कोमल बच्छाव तर आभार प्रा.सुवर्णा पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन वनश्री मोतीलाल पाटील, व्हा.चेअरमन हिरालाल पटेल, सचिव ए.के. पटेल तर संस्थेचे संचालक अभिजित एम. पाटील, महाविद्यालयीन विकास समिती सदस्या प्रीती अभिजित पाटील व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, आय.एम.आर.डी. आणि सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.