जग्मा वर्ल्ड स्कूलमध्ये ‘नॅशनल गर्ल डे’ साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:13 PM2019-10-15T13:13:24+5:302019-10-15T13:13:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : खेडदिरग, ता.शहादा येथील जग्मा वर्ल्ड स्कूलमध्ये नॅशनल गर्ल डे साजरा करण्यात आला. या वेळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : खेडदिरग, ता.शहादा येथील जग्मा वर्ल्ड स्कूलमध्ये नॅशनल गर्ल डे साजरा करण्यात आला. या वेळी विद्याथ्र्यानी स्त्री भृ्रण हत्या, लहान मुलींचे संरक्षण, लोकांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन, मुला-मुलींमधील फरक या विषयावर नाटीका सादर केली.
नाटीकेत लब्धी जैन, नमन जैन, अनुन्या जैन, नमिष जैन, एंजल हरसोला, राधिका चांडक, निलाक्षी पाटील, अंश माहेश्वरी, नंदीनी चौधरी, चेतना राजपूत, आस्था शिंदे, वेदिका जैन, प्रेम मराठे, छबी हरसोला, स्वरांजली खैरनार, अक्षया लांबोळे, पूनम पाटील, हिताशी पाटील यांनी सहभाग नोंदविला. यानंतर लहान मुला-मुलींचे प्रश्न तथा अडचणी जाणण्यासाठी ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आला असून, त्याचे उद्घाटन मोनालीसा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रा.शरद पाटील यांनी लहान मुला-मुलींविषयी उद्भ्वणारे छोटे पण महत्वाच्या प्रश्नांवर विद्याथ्र्याना मार्गदर्शन केले. या वेळी बेटी बचाओ व बेटी पढाओ ही संकल्पना जोपासण्याकरीता विद्याथ्र्यानी स्वत:च्या हाताने तयार केलेले बॅचेस शिक्षक व कर्मचा:यांना दिले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रियांक पाटील, संस्थापक जगदीश पाटील, मायाबाई पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी प्राचार्या शिल्पा चन्ने, गणेश चौधरी, विक्रांत अहिरे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नेहा पाटील तर आभार शिना नांबियार यांनी मानले.