लोकशाहीच्या उत्सवात कष्टकरी घामातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:43 AM2019-10-22T11:43:34+5:302019-10-22T11:43:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकशाही उत्सवातला मतदान हा महत्वाचा भाग असून यात सहभागी होता यावे, यासाठी शासकीय सुटी ...

In the celebration of democracy, in the sweat of hard work | लोकशाहीच्या उत्सवात कष्टकरी घामातच

लोकशाहीच्या उत्सवात कष्टकरी घामातच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लोकशाही उत्सवातला मतदान हा महत्वाचा भाग असून यात सहभागी होता यावे, यासाठी शासकीय सुटी जाहीर करण्यात आली. जे सरकारी व निमसरकारी सेवेत आहे, त्यांना सुटी घेतली तरी त्यांच्या उदरनिर्वाहावर फारसा फरक पडणार नाही. परंतु गरीब कष्टक:यांनी यासाठी सुटी घेतल्यास त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण परिवारावर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. ही समस्या टाळण्यासाठी गरीब कष्टकरी भल्या पहाटे तयारी करीत सकाळी सर्वात आधी मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही बळकटीकरणास योगदान देत त्यांनी नेहमीप्रमाणे दिवसभर  घामही गाळला.
नेहमीप्रमाणेच रोजंदारीने काम करीत उदरनिर्वाह करणारे उत्सव असला तरी या उत्सवाला फारसे महत्व न देता कामाच्या ठिकाणी वेळेत हजर राहण्यासाठी धावपळ करताना दिसून आले. तर बहुतांश गरीब बांधव हे सकाळी लवकरच मतदानाचा राष्ट्रीय हक्क बजावत वेळेवर कामाच्या ठिकाणी हजर झाले. 
नंदुरबार तालुक्यातील घुली पळाशी व होळहवेली येथील काही मजूर काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाकडून काढण्यात आलेले सिमेंटचे एंगल्स तोडण्याचे काम    करीत आहेत. या कामावरील एकही दिवस सुटल्यास परिवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे या मजूरांनी सांगितले.  त्यामुळे हे मजूर नेहमीप्रमाणे मतदानाचा दिवस असला तरी या दिवशी दिवसभर कामावर हजर राहिले. परंतु त्यांनी लोकशाही बळकटी करण्यासाठी देखील योगदान दिले आहे. सकाळी सर्वात आधी मतदानाचा हक्क बजावून पोटा-पाण्यासाठी कामाकडे धाव घेतल्याचे या मजूरांनी सांगितले. 

मतदान असले तरी पोटापाण्याचा पश्न सोडविण्यासाठी काही कामगार व कष्टक:यांनी आपापल्या कामांना प्राधान्य देत आधी आपली कामे पूर्ण केली. त्यात नवापूर तालुक्यातील खातगावपासून खांडबारा, ढेकवद या भागातील कष्टकरी चारा व मोळी विकणा:या महिलांनी नेहमीप्रमाणे नंदुरबार शहरात येऊन चारा व मोळी विकल्या. सायंकाळी उशिरापर्यत मतदान प्रक्रिया सुरू राहणार असल्यामुळे दिवसभरातील संपूर्ण कामेही त्यांनी आटोपत मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
दुर्गम भागातील बहुसंख्य मजूर नंदुरबारात येऊन बांधकामावर बिगारीचे काम करीत आहे. काही मजूर दस:याच्या वेळेस गावाकडे परतले होते, परंतु काही मजूर मतदानाचा दिवस असूनही नंदुरबारात कामावर आहे. त्यात कुंडल ता.धडगाव येथील काही मजूरांचा समावेश असून त्यांनी मतदानाऐवजी रोजगारालाच अधिक महत्व दिले आहे. 

Web Title: In the celebration of democracy, in the sweat of hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.