शहरातील पेट्रोल व डिङोलवरील सेस रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:55 AM2019-06-25T11:55:20+5:302019-06-25T11:55:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील दोन उड्डाण पुलांवर झालेला खर्च भरून काढण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने लावलेला पेट्रोल व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील दोन उड्डाण पुलांवर झालेला खर्च भरून काढण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने लावलेला पेट्रोल व डिङोलरवरचा सेस 1 जानेवारीपासून रद्द करण्यात येणार आहे. याबाबत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानपरिषदेत सोमवारी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. यामुळे गेल्या 15 वर्षानंतर शहरवासीयांची सेसमधून सुटका होणार आहे.
नंदुरबारातील दोन उड्डाणपुलांसाठी रस्ते विकास महामंडळाने 22 कोटी रुपये खर्च झाला होता. त्यातील काही निधी आदिवासी विकास महामंडळाने दिला होता. उर्वरित खर्च वसुलीसाठी महामंडळाने आधी काही वर्ष शहरात सहा ठिकाणी टोलनाके लावले होते. ते रद्द झाल्यानंतर पेट्रोल व डिङोलवर अनुक्रमे एक व दोन रुपये सेस लावला होता. वेळोवेळी सेसची मुदत वाढविण्यात आली होती. शासनाने हा सेस रद्द करावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यापूर्वी देखील विधीमंडळात हा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु अर्थ खात्याने डिसेंबर 2019 र्पयत मुदतवाढ दिल्याने मध्येच तो बंद करता येणार नसल्याचे सांगितले होते. आता डिसेंबरला मुदत संपल्यानंतर सेसची मुदत 1 जानेवारीपासून वाढवू नये अशी मागणी आमदार रघुवंशी यांनी सोमवारी केली.
आमदार रघुवंशी यांच्या प्रश्नावर अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी डिसेंबर 2019 नंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे जानेवारी 2020 पासून नंदुरबारात पेट्रोल व डिङोल अनुक्रमे दोन व एक रुपये स्वस्त होणार आहे.
प्रवासी संघटनेचा दावा
दरम्यान, सेस रद्द व्हावा यासाठी प्रवासी संघटनेने देखील वेळोवेळी आंदोलने केली होती. लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर धरणे धरून काळे ङोंडे लावले होते. संघटनेच्या संघर्षाला यश आल्याचे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी सांगितले.