दोन वर्षांचे दफ्तर उपलब्ध तरीही चोरीचे कारण दाखवून चाैकशीला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:34 AM2021-09-23T04:34:02+5:302021-09-23T04:34:02+5:30
यात तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. जाधव यांचा खुलासा महत्त्वपूर्ण असून, २०१६ ते २०१७ व फेब्रुवारी २०१८पर्यंतचे दफ्तर त्यांच्याकडे ...
यात तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. जाधव यांचा खुलासा महत्त्वपूर्ण असून, २०१६ ते २०१७ व फेब्रुवारी २०१८पर्यंतचे दफ्तर त्यांच्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.
दुसरीकडे जून २०२१मध्ये अक्कलकुवा ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी म्हणून रुजू झालेले आर. आर. वळवी यांचा खुलासाही महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यांनी एकाही ग्रामसेवकाने दफ्तरी चार्ज न दिल्याने कामकाज करु शकत नसल्याचे म्हटले होते.
दोन जबाबांमुळे निर्माण होतोय संभ्रम
अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच व उपसरपंचांनी दिलेल्या खुलाशात २५ जून २०२१ रोजी तत्कालीन गटविकास अधिकारी एम. जी. पाेतदार व ग्रामविस्तार अधिकारी ए. के. बिऱ्हाडे यांनी भेट देत २०१६ ते २०२०चे दफ्तर पाहून कपाट सील केल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे याचदिवशी ग्रामविकास अधिकारी आर. आर. वळवी हे ग्रामपंचायतीत रुजू झाले होते. त्यांना पंचायत चालविण्यासाठी दफ्तर मात्र देण्यात आले नव्हते. तसा खुलासा त्यांनी दिला आहे. यावेळी विद्यमान पदाधिकाऱ्यांनी दफ्तर उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगितले होते.