अक्कलकुवा व खापर गटात पाच मतदान केंद्रांमध्ये बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:33 AM2021-09-27T04:33:05+5:302021-09-27T04:33:05+5:30
खापर गटातील आमलीफळी जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र ८/११ आमलीफळी रोडच्या डाव्या बाजूला ठेवण्यात आले आहे. या केंद्राला खापर ...
खापर गटातील आमलीफळी जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र ८/११ आमलीफळी रोडच्या डाव्या बाजूला ठेवण्यात आले आहे. या केंद्राला खापर ते ब्राम्हणगाव रस्ता गणेश मंदिर, खापर ते जावली रस्ता, जिल्हा परिषद मुलांची शाळा खापर असे भाग जोडण्यात आले आहेत.
अक्कलकुवा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक ९/६, केंद्र क्रमांक ९/८ व केंद्र क्रमांक ९/९ मतदान केंद्रांना नवीन भाग जोडण्यात आला आहे. यात मेनरोड, झेंडा चौक, जैन मंदिर, नर्मदा नगर, सीता नगर, हवलदार फळी, कुंभार गल्ली, इंदिरा नगर, नवोदय विद्यालय, संजय नगर, कुंभार गल्ली, इंदिरा नगर, बाजार गली, मेनरोड, नर्मदा नगर, नवोदय विद्यालय, संजय नगर, पोलीस लाईन या परिसराचा समावेश करण्यात येऊन मतदान केंद्राचे ठिकाण बदलण्यात आले आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. मैनाक घोष, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी रामजी राठोड, महसूल सहायक राजरत्न सोनवणे, महसूल सहायक अशोक डोईफोडे, तहसील अक्कलकुवा उपस्थित होते. मतदान केंद्रातील बदलाबाबत राजकीय पक्ष व उमेदवार यांची बैठक तहसील कार्यालयात घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. मैनाक घोष, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी रामजी राठोड यांनी विविध सूचना केल्या.
अक्कलकुवा येथे यापूर्वी ९ मतदान केंद्रे होती. यात ६ हजार ५०० पेक्षा जास्त मतदार एकाच ठिकाणी मतदानासाठी येणार होते. कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने सामाजिक अंतर राहावे म्हणून यासाठी मतदान केंद्र क्रमांक ९/६, ९/७, ९/८, ९/९ हे मतदान केंद्र न्यू इंग्लिश स्कूल येथे हलविण्यात आले आहे.
याबाबतीत राजकीय पक्ष व उमेदवार यांची बैठक आज तहसील कार्यालयात बोलविण्यात आली होती आणि त्यांना याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. मैनाक घोष, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी रामजी राठोड यांनी सूचना केल्या आहेत