लोकसभा निवडणुकीनंतर बदलले समिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:33 PM2019-07-04T12:33:39+5:302019-07-04T12:33:49+5:30

मनोज शेलार।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकसभा निवडणुकीनंतर अक्कलकुवा मतदार संघाचे काहीसे बदललेले राजकीय समिकरण विधानसभा निवडणुकीत काय ...

Changes made after Lok Sabha elections | लोकसभा निवडणुकीनंतर बदलले समिकरण

लोकसभा निवडणुकीनंतर बदलले समिकरण

Next

मनोज शेलार। 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीनंतर अक्कलकुवा मतदार संघाचे काहीसे बदललेले राजकीय समिकरण विधानसभा निवडणुकीत काय आणि कसे रंगत आणते याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. विधानसभेसाठी आमदार अॅड.के.सी.पाडवी हेच काँग्रेसतर्फे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे तर भाजपमध्ये इच्छूकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेनाही तयारीला लागली असून वंचीत आघाडी किंवा एमआयएम येथे उमेदवार उभा करण्याची शक्यता बळावली आहे. 
राज्यातील पहिल्या क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून अक्कलकुवा मतदारसंघ ओळखला जातो. पूर्वी हा मतदारसंघ अक्कलकुवा व तळोदा असा होता. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ व अक्कलकुवा व धडगाव या दोन तालुक्यांचा झाला. अवघा 10 टक्के सपाटीचा आणि 90 टक्के सातपुडय़ातील द:याखो:यातील गाव, पाडय़ांचा समावेश असलेला हा मतदारसंघ थेट गुजरात आणि मध्यप्रदेश सिमेर्पयत विभागला गेला आहे. 
मतदारसंघात सातत्याने अर्थात गेल्या पाच टर्मपासून आमदार अॅड.के.सी.पाडवी हे निवडून येत आहे. यंदा त्यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब अजमविले परंतु त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. स्वत:च्या विधानसभा मतदारसंघात देखील त्यांना अवघा 159 मतांचा लीड आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे समिकरणे बदलण्याची शक्यता आहे. 
भाजपतर्फे देखील अनेकजण इच्छूक राहणार आहेत. त्यात माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी, नितेश  वळवी यांच्यासह आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांची कन्या डॉ.सुप्रिया गावीत यांचे नावही चर्चेत आहे. 
शिवसेनेतर्फे आमशा पाडवी यांनी वर्षभरापासूनच मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीतर्फे विजयसिंग पराडके व किरसिंग वसावे यांनी तयारी सुरू केली आहे. 
अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत एमआयएमने यश मिळविल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परिणामी वंचीत आघाडीतर्फे किंवा एमआयएम स्वत: उमेदवार  उभा करण्याची शक्यता आहे. एकुणच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातील लढत ही चुरशीची तेवढीच राजकीय समिकरणे बदलविणारी ठरणार असल्याचे एकुणच चित्र आहे. 

भाजपतर्फे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, माजी आमदार नरेंद्र पाडवी, नितेश वळवी हे इच्छूक आहेत. शिवाय आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांची कन्या डॉ.सुप्रिया गावीत यांनी देखील उमेदवारीसाठी तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
कॉँग्रेसतर्फे आमदार अॅड.के.सी.पाडवी यांचीच उमेदवार जवळपास निश्चित आहे.
राष्ट्रवादीतर्फे गेल्या निवडणुकीतील उमेदवार विजयसिंग पराडके तसेच जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे हे इच्छूक आहेत.
शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी तयारी सुरू केली आहे.
वंचीत बहुजन आघाडी व एमआयतर्फेही येथे उमेदवार दिला जाण्याची शक्यता असून अनेकांनी वंचीतशी संपर्क देखील केला आहे. याशिवाय भाजपमधील काही जण बंडखोरी करण्याची शक्यताही नाकारण्यात येत नाही.
 

Web Title: Changes made after Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.