नंदुरबार मार्गावरील रेल्वेगाडय़ांच्या वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:28 PM2019-06-30T12:28:21+5:302019-06-30T12:28:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेल्वेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 1 जुलैपासून अंमलात येणार आहे. या वेळापत्रकात ...

Changes on the schedule of trains on the Nandurbar route | नंदुरबार मार्गावरील रेल्वेगाडय़ांच्या वेळापत्रकात बदल

नंदुरबार मार्गावरील रेल्वेगाडय़ांच्या वेळापत्रकात बदल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रेल्वेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 1 जुलैपासून अंमलात येणार आहे. या वेळापत्रकात ‘नंदुरबार-उधना-मेमू’ आणि ‘उधना-पाळधी-मेमू’ या रेल्वेगाडय़ांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
रेल्वेचे नवीन वार्षिक वेळापत्रक जाहीर झाले असून अनेक रेल्वे गाडय़ांच्या वेळेत बदल झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पित झालेली नंदुरबार-उधना मेमू दुपारी दीड वाजता सुटायची. त्यापाठोपाठ भुसावळ-सुरत पॅसेंजर अडीच वाजता नंदुरबारहून सुटायची. त्यामुळे मेमू ट्रेन रिकामीच धावत होती. परंतु आता मेमू ट्रेन साडेतीन तास अगोदर म्हणजेच सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी नंदुरबारहून सुटणार आहे. त्यामुळे उधना जाणा:या प्रवाशांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचप्रमाणे उधना-पाळधी मेमू दुपारी दोन वाजून 35 मिनीटांनी नंदुरबार स्टेशनवर येत होती. त्याचवेळेस भुसावळ-सुरत पॅसेंजर स्टेशनवर उभी असायची. एकाचवेळेस दोन  पॅसेंजर ट्रेन स्टेशनवर असल्यामुळे मेमू ट्रेन रिकामीच धावत होती. परंतु नवीन वेळापत्रकानुसार उधना-पाळधी  मेमू दुपारी चार वाजता नंदुरबार स्टेशनवर येऊन चार वाजून पाच मिनिटांनी सुटणार आहे. त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासाला मेमू ट्रेन रात्री साडेबाराऐवजी रात्री एक वाजता नंदुरबारहून सुटणार आहे.
याव्यतिरीक्त अहमदाबाद-इलाहाबाद एक्सप्रेस रात्री साडेआठ वाजता नंदुरबार स्टेशनवर येऊन रात्री आठ चाळीसला सुटत होती. त्याऐवजी आता नऊ पस्तीसला येऊन पावणेदहा वाजता सुटणार आहे. उधना-जयनगर अंत्योदय एक्सप्रेस सकाळी अकरा चाळीसऐवजी दुपारी सव्वा बाराला नंदुरबारहून सुटेल. अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्सप्रेस दुपारी दोन बावीसला सुटत होती. त्याऐवजी आता दोन वाजून 12 मिनीटांनी नंदुरबारहून सुटणार आहे. सुरत-भुसावळ पॅसेंजर रात्री नऊ पस्तीसला सुटत होती त्याऐवजी आता नऊ पंचवीसला सुटणार आहे. राजकोट-रिवा एक्सप्रेस रात्री बारा पस्तीसला सुटत होती त्याऐवजी रात्री एक दहाला नंदुरबार स्टेशनवरून सुटेल.अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस, ओखा-पुरी एक्सप्रेस आणि अहमदाबाद-यशवंतपूर एक्सप्रेस वेगवेगळ्या दिवसांना रात्री एक वाजून वीस मिनिटांनी सुटत होत्या त्याऐवजी आता रात्री पावणे दोन वाजता सुटणार आहे. उधना-वाराणसी एक्सप्रेस रात्री बारा चाळीसला नंदुरबारहून सुटत होती त्याऐवजी आता रात्री एक वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. वलसाड-मुज्जफरपूर एक्सप्रेस आणि वलसाड-कानपूर एक्सप्रेस रात्री बारा चाळीसला सुटत होती त्याऐवजी रात्री बारा वाजून 55 मिनीटांनी सुटणार आहे.
 

Web Title: Changes on the schedule of trains on the Nandurbar route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.