दत्त जयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 01:00 PM2020-12-25T13:00:41+5:302020-12-25T13:00:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  २९ डिसेंबर ते १२ जानेवारी  या कालावधीत श्री दत्तजयंतीनिमित्त सारंगखेडामार्गे होणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल ...

Changes in transport routes on the occasion of Datta Jayanti | दत्त जयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

दत्त जयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  २९ डिसेंबर ते १२ जानेवारी  या कालावधीत श्री दत्तजयंतीनिमित्त सारंगखेडामार्गे होणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. 
श्री दत्त जयंती उत्सवादरम्यान २८  डिसेंबर  ते १३ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गावरील शहादा, सारंगखेडा, दोंडाईचाकडे जाणारे जड वाहनांना (उदा. ट्रेलर, चारचाकरी वाहनांची वाहतूक करणारी वाहने, कारखान्याची मशिनरी वाहतूक करणारी वाहने ) सारंगखेडारोडमार्गे घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
गुजरात राज्यातून अक्कलकुवा- तळोदा-शहादा-सारंगखेडा मार्गे सोनगीर-धुळेकडे जाणारी अवजड वाहने ही शहादा-अनरद बारी-वडाळी-शिरपूरमार्गे सोनगीर-धुळेकडे जातील किंवा तळोदा- प्रकाशा-नंदुरबार-दोंडाईचामार्गे सोनगीर-धुळेकडे जातील. 
धुळेकडून सोनगीर फाटा-दोंडाईचा-सारंगखेडा मार्गे शहादाकडे येणारी अवजड वाहने ही दोंडाईचा चौफुली-नंदुरबार-प्रकाशा मार्गे शहादाकडे जातील किंवा सोनगीर फाटा-शिरपूर-वडाळी- अनरदबारीमार्गे शहादाकडे जातील असे प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी कळविले आहे.

Web Title: Changes in transport routes on the occasion of Datta Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.