भोंग-या बाजारानिमित्त तळोदा परिसरात चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:53 AM2018-02-28T11:53:07+5:302018-02-28T11:53:07+5:30

Chantya in the neighborhood of Taloda around Bhong or Market | भोंग-या बाजारानिमित्त तळोदा परिसरात चैतन्य

भोंग-या बाजारानिमित्त तळोदा परिसरात चैतन्य

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद/तळोदा : तळोदा तालुक्यातील बोरद येथे महत्वाच्या असलेल्या भोंग:या बाजाराला गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात झाली आह़े आदिवासी बांधवांमध्ये यानिमित्त उत्साहाचे वातावरण दिसून येत आह़े
बोरद परिसरातील मालदा, तुळाजा, करडे, जुवानी, लाखापूर, न्युबन, छोटाधनपुर, मोड, खेडले, त:हावद, गंगानगर, कटेल, मोहिदा, कळमसरे, आष्टे, अक्राणी, खरवड आदी 27 गावांचे आदिवासी बांधव आपल्या परंपरेनुसार भोंग:या बाजारात सहभाग घेत आहेत़ या उत्सवात आपआपल्या प्रथा परंपरेनुसार वेशभुषा करुन नाचत-गात उत्साहाचा आनंद साजरा करण्यात येत आह़े होळीच्या दोन दिवस आधी भोंग:या बाजारातून होळीला लागणारे हार, कंगण, चांदीचे दागिने, कटलरी सामान, बांगडी आदी वस्तूंची खरेदी करण्यात येत आह़े
लहान मुलांसाठी खेळणी तसेच उपहारगृह, विविध व्यावसायिकांची दुकाने लागण्यास आता सुरुवात झाली आह़े होळीच्या दोन दिवस अगोदरच सुमारे 4 लाखांची उलाढाल यामाध्यमातून दरवर्षी होत असत़े भोंग:या बाजारासाठी बोरद ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठाही करण्यात उपलब्ध करुन देण्यात आला आह़े त्याच प्रमाणे 24 तास वीजसुध्दा उपलब्ध करुन देण्यात येणार आह़े पोलीस प्रशासनाकडूनही भोंग:या बाजार व होळीनिमित्त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आह़े पोलीस कर्मचा:यांना सुचना देण्यात आल्या आहेत़ एसटी महामंडळाने भोंग:या बाजार व होळीनिमित्त जादा बसेस सोडाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आह़े
दरम्यान, सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या देववाल्हेरी येथे होलिकोत्सव साजरा करण्यात येत आह़े या होलिकोत्सवात सहभागी आदिवासी बांधवाच्या गेर नृत्याचा उत्साह शिगेला पोहचला आह़े
काठीच्या राजवाडी होळी प्रमाणेच सातपुडय़ाच्या देहवाल भागातील पंधरा दिवसाच्या दिंडीला याहा गेर नृत्यांने सुरुवात झाली आह़ेआदिवासी बांधव गेर नृत्याचा सराव करण्यासाठी एकत्र येत असल्याचे दिसून येत आह़े बासरी, मांदूल, नगारा तसेच ढोलच्या तालावर सातपुडय़ातील देहवाल भाग दुमदुम असल्याचे चित्र आह़े
या कालावधील विविध पारंपारिक नृत्य करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आह़े जुनवाणी, बासरी वादन मृदूल वादन, नगारा वादन आदी विविध वादन प्रकारांचा सराव आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आह़े होलिकोत्सवाच्या दिंडल याहाच्या गरे नृत्यानिमित्त विविध गावपाडय़ातून शिकावू युवक येत असून त्यांना जुनेजाणकार प्रशिक्षण देत आहेत़ आदिवासी बांधवांकडून नृत्याचा सराव करण्यात येत आह़े दरम्यान, गेर नृत्याचे उगमस्थान तळोदा तालुक्यातील आंबागव्हाण येथून झाल्याचे सांगण्यात येत आह़े

Web Title: Chantya in the neighborhood of Taloda around Bhong or Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.