पत्रातील चरित्ररेखा भेटतात, तो खरा पुनप्र्रत्ययाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:02 PM2018-12-24T12:02:57+5:302018-12-24T12:03:02+5:30

साने गुरुजी जयंती विशेष : सुधाताई बोडा यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत

 The characters in the letter meet, they enjoy the real reunion | पत्रातील चरित्ररेखा भेटतात, तो खरा पुनप्र्रत्ययाचा आनंद

पत्रातील चरित्ररेखा भेटतात, तो खरा पुनप्र्रत्ययाचा आनंद

Next

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : साने गुरुजींनी अर्थात अण्णांनी लिहीलेली पत्रे ही माङया आयुष्यातील अनमोल ठेवा आहे. या पत्रातील चरित्ररेखा आजही सहा दशकानंतर भेटतात तेव्हा ख:या अर्थाने तो पुनप्र्रत्ययाचा आनंद मिळतो, अशी प्रतिक्रिया साने गुरुजींच्या पुतणी सुधाताई बोडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. त्याचबरोबर साने गुरुजींच्या आंतरभारतीच्या स्वप्नाला गती मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
साने गुरुजींची सुधास पत्रे, जी पत्रे आजही ‘सुंदर पत्रे’ या पुस्तकरुपात साहित्य क्षेत्रातील अमूल्य ठेवा मानला जातो. जून 1949 ते जून 1950 या वर्षभराच्या काळात प्रत्येक आठवडय़ाला एक अशी पत्रे साने गुरुजींनी आपल्या पुतणी सुधाला लिहीली होती. ही पत्रे म्हणजे महाराष्ट्रातील सांस्कृतिक धन मानले जाते. अनेक विचारवंतांनी श्रीकृष्णाने अजरुनाला सांगितलेली गीता या शब्दात या पत्रांचे वर्णन केले आहे. ती सुधा अर्थात सुधाताई बोडा ह्या सध्या बडोदा येथे वास्तव्यास आहेत. वयाची 85 वर्षे पूर्ण केली असून एक व्रतस्थ व तपस्वीसारखे जीवन त्या जगत आहेत. आपल्या घराच्या अवतीभोवती त्यांनी विविध वृक्षांचे संगोपन करून घराभोवती कोकणच फुलवला आहे. त्यांची भेट म्हणजे पुस्तकातून अनुभवास आलेले साने गुरुजींचीच अनुभूती आहे. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या. त्या म्हणाल्या, गुरुजींचा मला खूप सहवास लाभला नाही. कारण आपण वयाच्या 13 व्या वर्षी असतानाच अण्णा गेले. तत्पूर्वी ते भूमीगत व कारावासातच होते. 1948  ते 1950 या काळात त्यांचा काही काळ सहवास लाभला. मात्र याही काळात त्यांच्या विविध कार्यक्रमांसाठी बाहेर दौरे असायचे. जेवढा काळ ते घरी असायचे त्या काळातही घरी होणा:या बैठका, नियोजन, भेटीसाठी येणा:यांचा राबता यामुळे खूप कमी त्यांच्याशी संवाद साधता आले. पण त्यांची पत्रे मात्र आपल्या आयुष्यातील अनमोल ठेवा राहिला. या पत्रात त्या त्या काळाचे अनेकांचे संदर्भही  आहेत. आज सहा दशकानंतरही पत्रातील काही चरित्ररेखा भेटत असतात किंवा आपण सुद्धा मुद्दामहून त्यांना भेटायला जात असते. गेल्याचवर्षी आपण मुद्दामहून कर्नाटकातील गदगला गेलो होतो. गुरुजींनी 10 जून 1950 ला शेवटचे पत्र लिहीले होते. त्यात गदग, धारवड, हुबळीबाबत लिहीले होते. बडोद्यातच एक मैत्रिण आहे. तिचे माहेर तेथीलच. त्यांनी जेव्हा या गावाविषयी सांगितले तेव्हा आपणही तिच्यासोबत तेथे गेलो. तेथे गेल्यानंतर गुरुजींनी ज्या डॉ.अण्णासाहेब चाफेकरांबद्दल लिहीले होते त्यांच्या घरी आपण गेलो.  तेथे गुरुजींसोबतचा त्यांच्या कुटुंबाचा फोटो पहायला मिळाला. त्यांची मुलगी छबा व नात किर्ती या हयात आहेत. त्यातील किर्तीला भेटता आले. त्याच गावातील ज्या मंदिराचे वर्णन गुरुजींनी केले होते त्या मंदिरातील पुजा:याला भेटता आले. त्यांनी गुरुजींच्या आठवणी सांगितल्या. नव्हे तर ‘श्यामनताई’ हे पुस्तक अर्थात कन्नड भाषेत अनुवादीत झालेल्या ‘श्यामची आई’ पुस्तक वाचल्याचे सांगितले. या आठवणींनी ते गहिरवले. अशा कितीतरी चरित्ररेखा आज भेटतात. तेव्हा ख:या अर्थाने पुनप्र्रत्ययाचा आनंद येतो.
आपण देश-विदेशात विविध ठिकाणी फिरले. त्या त्या ठिकाणी गुरुजींच्या आठवणी लोकांनी सांगितल्या. काहींनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचल्याचे सांगितले. ते पुस्तक महाराष्ट्रात तर घरोघरी पोहोचलेच पण देशातील विविध भागात आणि सातासमुद्रापारही पोहोचल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. हे पुस्तक मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, सिंधी या विविध भाषात तर अनुवादीत झालेच पण जापानी भाषेतही ते छापले गेले आहे. आपल्या नातीची मैत्रिण बेंगलोरला शिक्षण घेत आहे. तेथे आपण गेलो असता त्याच शाळेत जपानी मुलगी शिक्षण घेत होती. तिच्या पालकांना भेटल्यानंतर त्याबाबतची आपल्याला माहिती झाली. जपानच्या शिक्षिका शोकोनाका गावा यांनी हे पुस्तक जापानी भाषेत छापून जपानमध्ये लोकांर्पयत पोहोचविण्यासाठी प्रय} करीत आहेत. हे पुस्तक जापानच्या अनेक कुटुंबांमध्ये संस्कार रुजविण्याचे काम करीत असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. अशा बाबी जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा खरोखरच मनाला खूप खूप आनंद होतो.
या सर्व गोष्टी घडत असताना एका गोष्टीची खंत मात्र निश्चित जाणवते ती म्हणजे आपले बंधू ‘वसंता’बाबत फारशी माहिती लोकांर्पयत पोहोचली नाही. तो एक डॉक्टर होता. अल्पकाळात त्याचे निधन झाले. कम्युनिस्ट विचाराचा त्याच्यावर प्रभाव होता. कम्युनिस्टांतर्फे त्याला महत्त्वाच्या कामासाठी चीनमध्ये पाठविण्याची तयारी सुरू होती. असे काही संदर्भ सापडतात. जे जे संदर्भ मिळाले त्यातून त्याचे उच्च विचार समाजाप्रती असलेली तळमळ जाणवते. पण त्याची अधिक माहिती अजून मिळू शकत नाही. त्याचेही चरित्र लोकांसमोर येण्याची गरज आहे. साने गुरुजींनी आंतरभारतीचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न साकारण्यासाठी काही धडपडणारी लोक त्या काळातही होती व आजही आहेत. पण या कामाला मात्र अजून गती मिळाली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
 

Web Title:  The characters in the letter meet, they enjoy the real reunion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.