टँकरद्वारे पुरवठा होणा:या पाण्याचीही गुणवत्ता तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:55 AM2019-05-30T11:55:55+5:302019-05-30T11:56:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मान्सूनपूर्व पाणी स्त्रोत तपसाणीत जिल्हा अव्वल राहिला आहे. यापुढे यात सातत्य कायम ठेवून टँकरने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मान्सूनपूर्व पाणी स्त्रोत तपसाणीत जिल्हा अव्वल राहिला आहे. यापुढे यात सातत्य कायम ठेवून टँकरने ज्या ठिकाणी पाणी पुरवठा होत असेल त्याचीही पाणी गुणवत्ता तपासणी करावी अशा सुचना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.
जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण समितीची आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मान्सून पूर्व व मान्सून कालावधीत पाणी गुणवत्ता संदर्भातील ग्रामस्तरावर करावयाच्या उपाययोजनांची महिती घेण्यात आली. लाल व पिवळे कार्ड असलेल्या ग्रामपंचायती, टिसीएल पावडर उपलब्धता व तपासणीचा आढावा घेण्यात आला. तालुकानिहाय पाणी गुणवत्ता विषयक माहिती घेतली. पाणी टंचाई मधील वैयक्तिक स्तरावरील टँकरने पाणी पुरवठा होत असलेल्या पाण्याचे शुद्धिकरण, भूजल विभागाच्या व आरोग्य प्रयोगशाळां मधील रासायनिक व जैविक तपासणी या विषयांवर आढावा घेण्यात आला. तसेच उपाययोजना करण्यासंदर्भात गौडा यांनी स्पष्ट निर्देश दिले.
2019-20 या आर्थिक वर्षात नंदुरबार जिल्हा राज्यात जीओफिनिसिंगसह पाणी नमुने पोहोच करण्यात 100 टक्के कामं करुन राज्यस्तरावर प्रथम क्रमांकावर आल्याबाबत त्यांनी कौतूक केले. जिल्हास्तरीय, तालुकानिहाय व ग्रामपंचायतनिहाय अधिकारी व कर्मचा:यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सारीका बारी, वरिष्ठ भूवैज्ञानिक जिवन बेडीवाल, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोरे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बावा, कनिष्ठ भू वैज्ञानिक विक्रांत ठाकूर, सर्व गटविकास अधिकारी, जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ नितीन पाटील, पाणी गुणवत्ता निरीक्षक जे.एस.पवार, कनिष्ठ अभियंता पिसे, जिल्हास्तरीय व तालुकानिहाय पाणी स्वच्छता कक्षाचे तज्ञ, सल्लागार, विस्तार अधिकारी उपस्थित होते.