कामांची गुणवत्ता स्वतंत्र संस्थेमार्फत तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:07 PM2019-08-05T12:07:18+5:302019-08-05T12:07:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा नियोजन समितीमार्फत गेल्या दहा वर्षात करण्यात आलेल्या कामांची माहिती संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. ...

To check the quality of work through an independent organization | कामांची गुणवत्ता स्वतंत्र संस्थेमार्फत तपासणार

कामांची गुणवत्ता स्वतंत्र संस्थेमार्फत तपासणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा नियोजन समितीमार्फत गेल्या दहा वर्षात करण्यात आलेल्या कामांची माहिती संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. शिवाय कामांची गुणवत्ता स्वतंत्र एजन्सीमार्फत तपासण्याचा निर्णय जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक घेण्यात आली. आमदार उदेसिंग पाडवी, सुरुपसिंग नाईक, डॉ.विजयकुमार गावीत, चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी, जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येणा:या विविध विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले, नंदुरबारात चांगल्या दर्जाचे ओपन जीम आणि सायन्स पार्क उभारण्यासाठी  आराखडा तयार करण्यात यावा. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा केंद्रस्थानी ठेऊन आरोग्य केंद्रात चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यात याव्यात. प्रमुख शहरात सीसीटीव्ही बसविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. 
लष्करी अळीपासून संरक्षणासाठी शेतक:यांना वेळेत मदत करावी. नवे बंधारे तयार करण्याबरोबरच बंधारे दुरुस्तीला प्राधान्य देण्यात यावे. ग्रामपंचायतींची इमारत, अमरधाम आणि रस्ते या क्रमाने ग्रामपंचायतींना विकासासाठी निधी देण्यात यावा. आश्रमशाळेतील विद्याथ्र्यांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. 
विकासकामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. गमन पॉईंट येथे पर्यटन विकासाची कामे लवकर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा रुग्णालयात मॉडेल ऑपरेशन थिएटर बनविण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी आणि साहित्य खरेदी लवकर करावी,असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विविध यंत्रणांमार्फत तयार करण्यात आलेल्या आराखडय़ावर झालेल्या चर्चेत लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्यातील क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी क्रीडा क्षेत्राच्या विकासाला जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून चालना देण्यात येणार आहे. प्रत्येक गावाला फूटबॉल, व्हॉलीबॉल आणि क्रिकेटचे साहित्य देण्यात यावे. या तीन खेळांवर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे. नव्याने तयार झालेले क्रिडा संकुल तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेला हस्तांतरीत करण्यात यावे अशा सुचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.
 

Web Title: To check the quality of work through an independent organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.