तळोद्यात मांजा विक्रेत्यांच्या दुकानांची झाली तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:55 PM2018-01-10T12:55:53+5:302018-01-10T12:56:42+5:30

Checkup of Manja Vendor's shops in Poulod | तळोद्यात मांजा विक्रेत्यांच्या दुकानांची झाली तपासणी

तळोद्यात मांजा विक्रेत्यांच्या दुकानांची झाली तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : मंगळवारी तळोदा येथील पोलीस प्रशासनाकडून किरकोळ पतंग व मांजा विक्री करणा:या दुकानांची तपासणी करण्यात आली़
जिल्ह्यात नायलॉन मांजामुळे दुर्घटना होऊन अनेक जण जखमी झाले आहेत़ याबाबत ‘लोकमत’तर्फे वृत्त प्रकाशित करण्यात आले होत़े जिल्ह्यात बंदी असलेला नायलॉन मांजा सर्रासपणे विकण्यात येत आह़े परंतु मानवी व प्राणी जीवित हानी होत आह़े त्यामुळे अनेक पर्यावरणवादी तसेच नागरिकांकडून संबंधितांवर  कारवाईची मागणी  करण्यात येत होती़़ याबाबत लोकमतकडून वृत्त प्रकाशीत करण्यात आले होत़े याचीच दखल घेत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक तालुक्यात पथक स्थापून कारवाईचे आदेश दिले होत़े परिणामी, तळोदा शहरात मंडळ अधिकारी अनेश वळवी यांच्यासह पोलीस अधिकारी चंद्रकांत शिंदे व पथकाने शहरातील किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली़ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी विक्रेत्यांची बैठक घेऊन नायलॉन मांजा विक्री करू नये अशी तंबी या आधी दिली होती़
 

Web Title: Checkup of Manja Vendor's shops in Poulod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.