चेतक फेस्टीवल : अश्वनृत्य स्पर्धेला प्रेक्षकांची भरभरुन मिळाली दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:40 PM2017-12-26T12:40:43+5:302017-12-26T12:40:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलमध्ये सोमवारी अश्व नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होत़ेया वेळी घोडय़ांच्या विविध कसरतींनी उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केल़े घोडय़ांच्या करामती पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती़
या अश्व स्पर्धेत जवळ-जवळ 22 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता़ रात्री उशिरार्पयत या नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या़ या स्पर्धेसाठी गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता़ अश्वांच्या लयबध्द नृत्यांनी सगळ्यांनाच खिळवून ठेवले होत़े
अश्वांच्या थाळी नृत्य स्पर्धेत चारही पाय गोलाकार थाळीवर ठेवून अश्वांनी नृत्य सादर केल़े त्याच प्रमाणे काही अश्वांनी एकावर एक ठेवलेल्या अरुंद पलंगावर नृत्य सादर केल़े काही अश्वांनी बुलेटवर उभ राहून नृत्य सादर केल़े अश्वाचे मालक थाळी, डफली वाजवत होते, तर त्यांचे अश्व त्या तालावर आपले पाय थिरकवत नृत्य सादर करीत होत़े
त्याच प्रमाणे काही अश्वांकडून केवळ दोन्ही पायांचा वापर करुन नृत्य सादर करण्यात आल़े याला उपस्थित प्रेक्षकांनीही ताळ्या वाजवून दाद दिली़ यावेळी अश्वांसोबतच अश्व मालकांनीही आपल्या अश्वासोबत चित्तथराकर कसरती सादर केल्या़ राजस्थानी नृत्यासोबतच विविध वाद्यांच्या आविष्कार पाहून अश्व प्रेमींना आपण राजस्थानातच असल्याचा आभास होत होता़ अनेक अश्वांनी टेबल, खुर्ची, पलंग, बुलेट, थाळी आदी अरुंद साहित्यांवर चित्तथरारक प्रात्याक्षिके करुन दाखवली़