चेतक फेस्टीवल : मारवाडी नर स्पर्धेत ‘चेतक’ 3 लाखांचा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:41 PM2017-12-25T12:41:42+5:302017-12-25T12:42:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : चेतक फेस्टीवल जगाच्या कानाकोप:यार्पयत पोहचला आह़े या अश्वबाजाराची ख्याती अबाधीत राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केल़े या फेस्टीवलअंतर्गत घेण्यात आलेल्या अश्व प्रदर्शनातील विजेत्या घोडय़ांच्या मालकांचा रविवारी सन्मान करण्यात आला़
या वेळी पुढे बोलताना रावल म्हणाले की, महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय व चेतक फेस्टीवल समितीकडून चांगल्या पध्दतीने पर्यटनाला चालणा देण्याचे काम सुरु आह़े त्यामुळे सारंगखेडय़ाचेही नाव जगाच्या पाठीवर नावारुपास येत आह़े त्याच प्रमाणे मुंबई येथे भरविण्यात येणा:या दुबई फेस्टीवलच्या धर्तीवर मुंबई फेस्टीवलदेखील भरविण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी या वेळी दिली़
या वेळी जैसलमेर येथील महाराजा चैतन्यसिह, विक्रमसिंह, कुवर हरिसिंह चव्हाण, बडोद्याचे महाराज तारिक नवाब साहब, कुवर गजेंद्रसिह यांचे यांचे पर्यटन विभागामार्फत स्वागत करण्यात आल़े
कार्यक्रमात स्पर्धा विजयी झालेल्या 44 घोडे मालकांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आल़े चेतक फेस्टीवलचे आयोजन पाहुन भारावलेल्या अहमदाबाद येथील डी़एस़ स्डुड फॉर्मचे मालक दिनेश ठाकर, कुमार ठाकर, वनराज ठाकर, दिलराज ठाकर यांनी चेतक फेस्टीवल समितीला पाच लाख रुपयांचा धनादेश मंत्री जयकुमार रावल व फेस्टीवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्याकडे सुपूर्त केला़
जैसलमेरचे महाराज चैतन्य राजसिंह म्हणाले की, महाराष्ट्रात चेतक फेस्टीवल सारखा ऐवढा मोठा उत्सव संपूर्ण एक महिना घेत येत असल्याने त्यांनी कौतुक केल़े त्याच प्रमाणे चेतक फेस्टीवलमधून देशाच्या कान्याकोप:यातून येणा:या घोडय़ांच्या मालकांचेही त्यांनी कौतुक केल़े चेतक फेस्टीवलला जागतीक स्वरुप मिळण्यासाठी चेतक फेस्टीवल समिती व महाराष्ट्राचा पर्यटन विभागाचेही त्यांनी कौतुक केल़े
कार्यक्रमाला जयपालसिंह रावल, रणविरसिंह रावल, जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक संजय पाटील, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, छोटु मराठे, विक्रांत रावल, प्रणवराज रावल आदी उपस्थित होत़े