आदिवासी दिन कार्यक्रमाची जागा मुख्यमंत्र्यांचा सभेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:48 PM2019-08-04T13:48:51+5:302019-08-04T13:48:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : आदिवासी संस्कृतीची जपणूक व्हावी यासाठी दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : आदिवासी संस्कृतीची जपणूक व्हावी यासाठी दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात येतो़ यानिमित्त शहादा येथे कार्यक्रम नियोजित असतानाही प्रशासन व भाजपकडून त्याच दिवशी शहाद्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेण्यात येणार आह़े यातून पोलीस आणि तालुका प्रशासन यांच्यावर ताण निर्माण होऊन प्रशासनाने शहादा आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमाची जागा मुख्यमंत्र्यांच्या सभेला दिल्याने आदिवासी समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याची भूमिका ज्येष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे यांनी मांडली़ शहादा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होत़े
9 ऑगस्ट रोजी शहादा येथे होणा:या विश्व आदिवासी दिनाच्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती़ यावेळी सेवानिवृत्त उपवनसंरक्षक नामदेव पंटले, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता ङोलसिंग पावरा, सेवानिवृत्त उपवनसंरक्षक सुरेश मोरे, चंद्रसिंग बर्डे, सुनील सुळे, दामू ठाकरे, प्रा. ए़एम़ वळवी यांच्यासह आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना वाहरू सोनवणे यांनी सांगितले की, एक महिन्यापूर्वीच शहादा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यक्रम घेण्याबाबत बाजार समितीच्या पदाधिका:यांसोबत तोंडी चर्चा करुन परवानगी घेण्यात आली होती़ परंतू अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा घोषित करुन बाजार समितीच्या आवारात कार्यक्रम होणार असल्याचे जाहिर करण्यात आल़े यातून विश्व आदिवासी दिनाच्या नियोजित कार्यक्रमात अडचणी येत आह़े जिल्हाधिकारी ,पोलिस प्रशासन यांच्यासोबत चर्चा करुनही उपयोग झालेला नसून संघटनेला नाईलाजास्तव कार्यक्रमाचे स्थळ बदलायला लावले आह़े हा आदिवासी संस्कृतीच्या अपमान केला आह़े विश्व आदिवासी दिनापेक्षा मुख्यमंत्र्याच्या राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या दौ:याला महत्त्व देणे निंदनीय असल्याचे त्यांनी सांगितल़े
दरम्यान शहादा येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त होणारा मु्ख्य कार्यक्रम लोणखेडा बायपासवरील मीरा प्रताप लॉन्सवर होणार आह़े सकाळी 11 वाजता शहरातील जनता चौकातून सांस्कृतिक रॅली काढण्यात येणार आह़े यावेळी आदिवासी बांधव, महिला, युवक पारंपरिक वेशभूषेत रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली़