दोन कुपोषित बालकांना दत्तक घेवून बाळाचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:44 PM2019-07-07T12:44:43+5:302019-07-07T12:44:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी :लहानांपासून पासून तर मोठय़ांर्पयत वाढदिवस साजरा करण्याच फॅड समाजात मोठय़ा प्रमाणात पसरले आहे. कुणी पार्टी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी :लहानांपासून पासून तर मोठय़ांर्पयत वाढदिवस साजरा करण्याच फॅड समाजात मोठय़ा प्रमाणात पसरले आहे. कुणी पार्टी देतो तर कुणी वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवितात. परंतु रांझणी, ता.तळोदा येथील एका रणरागिनीने आपल्या बाळाच्या पहिल्या वाढदिवशी दोन आदिवासी कुपोषित बालके दत्तक घेऊन त्यांना सुदृढ करणार आहे. याशिवाय दहा गरोदर मातांचीही प्रसुतीपूर्व काळजी घेऊन औषधोपचार करणार आहे. या महिलेच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील आशागट प्रवर्तक ज्योती नारायण जाधव या महिलेने आपला बाळ जीत याचा वाढदिवस गेल्या आवडय़ात साजरा केला होता. आपल्या बाळाचा पहिला-वहिला वाढ दिवस साजरा करण्याचे नियोजन त्यांनी केले होते. वाढदिवसाला विधायक कार्य करण्याचा त्यांचा मानस होता. तेही समाजातील रंजल्या-गांजल्यांची सेवा करण्याचा होता. त्यामुळे त्यांनी सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या रोझवा पुनर्वसन येथील कुपोषित बालकांना दत्तक घेतले आहे. ही बालके तीव्र कुपोषित आहेत. आपल्या खर्चातून वर्षभर म्हणजे त्यांची श्रेणी वाढीर्पयत त्यांचा औषधोपचार व सकस आहार देऊन त्यांची काळजी घेणार आहेत. त्यानंतरही त्यांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. त्याच बरोबर रांझणी, गोपाळपूर व गोपाळपूर पुनर्वसन येथील 10 गरोदर मातांची नऊ महिन्यांर्पयत प्रसुतीपूर्व काळजी घेणार आहेत. यात मुख्यत्व लसीकरण, गर्भपोषण, रक्तवाढ व संदर्भ सेवा याकडे लक्ष देणार आहेत. ज्योती जाधव या आशाप्रवर्तक म्हणूनदेखील काम करीत आहेत. त्यामुळे समाजातील गरीबांच्या आरोग्याच्या वेदना जवळून पाहात असतात. तसे कुपोषण व सुरक्षित मातृत्व यावर वैद्यकीय अधिकारी डॉ.कांतीलाल पावरा यांच्या झटणा:यावृत्तीमुळे त्यांनाही आशा प्रवर्तकाचे काम करतांना प्रेरणा मिळाली आहे. याशिवाय पती डॉ.नारायण जाधवहेदेखील रात्री-बेरात्री गरीब रुग्णांना आरोग्य सेवेसाठी सदर तत्पर असतात. त्यामुळे आपण ही या उपक्रमातून रुग्णांची सेवा करण्याच माणस असल्याचे त्यांनी सांगितले.