बाजारावर पुन्हा पसरू लागली मिरचीची लाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:32 AM2021-09-25T04:32:58+5:302021-09-25T04:32:58+5:30

दरांमध्ये मात्र यंदा कमतरता गेल्या वर्षी नंदुरबार बाजार समितीत एकूण १ लाख ८० हजार क्विंटल मिरचीची खरेदी व्यापाऱ्यांनी केली ...

Chili redness started spreading in the market again | बाजारावर पुन्हा पसरू लागली मिरचीची लाली

बाजारावर पुन्हा पसरू लागली मिरचीची लाली

googlenewsNext

दरांमध्ये मात्र यंदा कमतरता

गेल्या वर्षी नंदुरबार बाजार समितीत एकूण १ लाख ८० हजार क्विंटल मिरचीची खरेदी व्यापाऱ्यांनी केली होती. कोरोना काळ असतानाही व्यापाऱ्यांनी ओल्या मिरचीला २ हजार ४०० ते ३ हजार २००, तर सुक्या मिरचीला ९ हजार रुपयांपर्यंत दर दिले होते. यंदा वेळेपूर्वी मिरचीची आवक सुरू झाली आहे. यातून या मिरचीला प्रति क्विंटल १ हजार ४०० ते १ हजार ८०० असे दर देण्यात आले आहेत. येत्या काळात या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सुक्या मिरचीची आवक सुरू झाल्यानंतर बाजारातील दरांमध्ये वाढ होत असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

व्हीएनआर आणि तेजाची लाली

बाजारात पहिल्या तीन दिवसांत व्हीएन आणि तेजा या दोनच वाणांच्या मिरचीची आवक झाली आहे. तीन दिवसांत एक हजार क्विंटल मिरचीची आवक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ही आवक जानेवारी २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान याबाबत बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले की, पहिल्या दिवसापासून बाजारात मिरचीची आवक सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची मिरची योग्य त्या दरांमध्ये खरेदी करून घेण्यात येत आहे. येत्या काळात आवक वाढीची शक्यता आहे.

Web Title: Chili redness started spreading in the market again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.