चो:यांमुळे नागरिक त्रस्त, पोलीस सुस्त
By admin | Published: February 7, 2017 12:45 AM2017-02-07T00:45:43+5:302017-02-07T00:45:43+5:30
धडक कारवाईची अपेक्षा : दर दोन दिवसाआड एक चोरी, नागरिकांनाच घालावी लागतेय गस्त
नंदुरबार : पोलीस सुस्त, जनता त्रस्त अशी स्थिती वारंवारच्या घरफोडय़ा व चो:यांमुळे शहरवासीयांची झाली आहे. काही भागातील नागरिकांनी स्वत:च गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे. एकप्रकारे हा शहर पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब असल्याचेच बोलले जात आहे. दरम्यान, सोमवारी उत्तर रात्री जगतापवाडी भागात पुन्हा एक घर फोडल्याची घटना घडली.
गेल्या दोन महिन्यांपासून घरफोडी, भुरटय़ा चो:या यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. झालेल्या घटनांमधील तपासही रेंगाळला आहे. एकाही घटनेतील आरोपीला पकडण्यात किंवा चो:या उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश आलेले नाही. याबाबत आता वरिष्ठ पोलीस अधिका:यांनीच दखल घेणे आवश्यक आहे.
दोन महिन्यात 20 घटना
गेल्या दोन महिन्यात 20 पेक्षा अधिक चोरीच्या घटना शहरात घडल्या आहेत. त्यात उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना वेगळ्याच आहेत. अर्थात दर दोन दिवसाआड एक चोरी अशी सरासरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. काही घटनांची नोंद होत आहे, तर काही घटनांमध्ये विनाकारण पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा नको म्हणून नागरिक नोंदच करीत नसल्याचे चित्र आहे. चोरीच्या प्रकारांमध्ये घरफोडी, मोटरसायकल चोरी, यासह घराच्या परिसरातून विद्युत मोटार चोरी आणि इतर घटनांचा समावेश आहे.
धाकच उरला नाही
शहरात पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे चित्र आहे. रात्रीची आणि दिवसाची गस्तदेखील कमी झाली आहे. गुन्हे उघडकीस आणणारे पथकदेखील निष्क्रिय ठरले आहे. त्यामुळे चोरटय़ांची फावले आहे. तीन दिवसांपूर्वी टिळक रस्त्यावरील एका दुकानातून महिलांनी वस्तू चोरून पसार झाल्या होत्या. त्यांना माळीवाडा भागातील काही महिलांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्या महिलांना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता तेथून त्या पसार झाल्याची बाबदेखील उघड झाली आहे. कुठल्याच बाबीचे गांभीर्य नसल्याने चोरांचे फावले आहे.
यंत्रणा दुबळी
गुन्हेगारांवर वचक ठेवणारी, गुन्हे उघडकीस आणणारी आणि नियमित गस्त घालणारी यंत्रणाच शहर पोलिसात केवळ नावालाच असल्याचे चित्र आहे. संबंधित कर्मचारी आपल्या वेगळ्याच कामात मगA राहत असतात. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनीदेखील या बाबीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचेच चित्र आहे. त्यामुळेच कर्मचा:यांचे फावले आहे. परिणामी शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे.
नागरिकांना दिलासा द्यावा
घडलेल्या घटनांचा तातडीने तपास करून त्या उघडकीस आणाव्या, पोलिसांचा धाक निर्माण करावा जेणेकरून शहरवासीयांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरात चोरीच्या वाढत्या घटनांसह अवैध धंद्यांनीदेखील डोके वर काढले आहे. शहरात भर रस्त्यांवर टप:या टाकून सट्टा व जुगार सुरू आहेत. त्यांमुळे एखाद्या वेळी कायदा व सुव्यस्थादेखील धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे व अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी जनसंपर्कावर भर देऊन त्यांच्यात सामिल होऊन लोकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करण्याचा प्रय} करीत असतांना दुसरीकडे नंदुरबारसारख्या जिल्हा मुख्यालयाच्या शहरात चो:या आणि अवैध धंद्यामुळे नागरिक बेजार होत असतील तर त्यांच्या प्रय}ांना खिळ घालण्याचेच काम होत असल्याच्या प्रतिक्रियादेखील जनसामान्यांमध्ये व्यक्त होत आहेत.
चो:यांना आळा घालण्यासाठी शहर पोलिसांतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी बैठका घेण्यात येत आहे. नागरिकांनीही सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.
-मिलिंद वाघमारे,
पोलीस निरीक्षक, नंदुरबार शहर ठाणे