अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादात नागरिक वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:09 PM2019-12-05T12:09:22+5:302019-12-05T12:09:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे कामे घेवून येणाºया नागरिकांना ताटकळत राहावे लागत असल्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे कामे घेवून येणाºया नागरिकांना ताटकळत राहावे लागत असल्याची स्थिती आहे. ड्युटी लावण्यावरून दोन अधिकाºयांमध्ये कार्यालयातच फ्रिस्टाईल देखील झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात आठवडाभरात दोन वेळा नागरिकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रारी करून निवेदनही दिले आहे.
सध्या नवीन मोटर वाहन कायद्यान्वये वाहनांच्या विविध कागदपत्रांची पुर्तता नसल्यास मोठ्या दंडाची रक्कम भरावी लागते. शिवाय नंदुरबारात वाहन तपासणी मोहिम सुरू असल्यामुळे तरुण, तरुणी, महिला यांचा चालक परवाना काढण्यासाठी देखील गर्दी होत आहे.
अशा वेळी नंदुरबारातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात मात्र संबधित अधिकाºयांच्या मनमानीमुळे अनेकवेळा कामकाज बंद ठेवले जात असल्यामुळे नागरिकांना ताटकळत राहावे लागत असते. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार येथे सुरू आहे.
कनेक्टीव्हिटी बंदचा बहाणा
दररोज काही ना काही कारणास्तव अनेकवेळा कामकाज बंद ठेवले जाते. नागरिकांनी विचारणा केली असता आॅनलाईन कामकाजासाठी कनेक्टीव्हिटी नसल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक याच भागात असलेल्या इतर कार्यालयांमध्ये कनेक्टिव्हिटीचा कोणतीही समस्या नसतांना येथेच ही समस्या वारंवार का उद्भवते असा प्रश्न नागरिकांमध्ये आणि कार्यालयातीलच कर्मचाºयांमध्ये देखील उपस्थित केला जात आहे.
परंतु कनेक्टिव्हिटी हा नुसताच बहाणा असून खरे कारण कार्यालयातील अधिकाºयांमधील अंतर्गत वाद असल्याचे बोलले जात आहे.
दिवसभर ताटकळणे...
कार्यालयात काम करण्यासाठी येणाºया नागरिकांना वारंवार काम बंद राहत असल्यामुळे या ठिकाणी दिवसभर ताटकळत राहावे लागते. जिल्हाभरातून येणारे नागरिक यामुळे हैराण होतात. यामुळे महिला व तरुणींचा देखील समावेश असतो. आधीच हे कार्यालय शहरापासून लांब अंतरावर असल्यामुळे येण्या-जाण्याच्या दृष्टीने मोठी कसरत होते.
सोयीच्या ठिकाणी ड्युटी
सोयीच्या ठिकाणी अर्थात नवापूर व गव्हाळी आंतरराज्य चेक नाक्यांवर ड्युटी लावण्यासाठी येथील अधिकाºयांमध्ये चढाओढ असते. त्यातूनच अंतर्गत वाद होतात. ज्यांची वारंवार कार्यालयातच ड्युटी लागते ते मात्र काही ना काही कारण पुढे करून येथे कामकाजावर परिणाम होईल या दृष्टीने पहात असतात असे कार्यालयातीलच कर्मचाºयांमध्ये बोलले जात आहे.
काही अधिकाºयांनी देखील या बाबीला दुजोरा दिला आहे. अधिकाºयांच्या या वादात मात्र सर्वसामान्य नागरिक भरडला जात असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात दोन ठिकाणी चेक नाके आहेत. या ठिकाणी ड्युटी लावण्यासाठी निरिक्षक व त्या दर्जाच्या अधिकाºयांमध्ये चढाओढ असते. या कारणावरूनच कार्यालयातील दोन अधिकाºयांमध्ये काही दिवसांपूर्वी वादावादी होऊन प्रकरण फ्रिस्टाईलपर्यंत पोहचले होते. हा प्रकार उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत पोहचला आहे. याशिवाय काही नागरिकांनी या ठिकाणी तक्रारी मांडल्या त्याचीही चित्रफित वरिष्ठाकडे पाठविण्यात आल्याचे कार्यालयातून सूत्रांनी स्पष्ट केले.