नंदुरबार शहरात वर्षभरात बेशिस्तीच्या 8 हजार केसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:46 PM2017-12-15T13:46:53+5:302017-12-15T13:47:00+5:30

In the city of Nandurbar 8 thousand cases of census in the year | नंदुरबार शहरात वर्षभरात बेशिस्तीच्या 8 हजार केसेस

नंदुरबार शहरात वर्षभरात बेशिस्तीच्या 8 हजार केसेस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील विविध भागातून बेशिस्तरितीने वाहन चालवत कायदा मोडणा:यांवर शहर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईतून 16 लाख रूपयांचा दंड वसूल केला आह़े जानेवारी ते नोव्हेंबर या दरम्यान आठ हजार केसेसमध्ये बेशिस्तांना हा दंड करण्यात आला होता़  
नंदुरबार शहर व लगतच्या मार्गावरून बेशिस्त दुचाकी, चारचाकी वाहनधारकांकडून नियम धाब्यावर बसवून वाहनचालवण्याची स्पर्धा सुरू असत़े यावर चाप बसवण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून दर महिन्याला धडक कारवाई करण्यात येत आह़े याचे फलित म्हणजे शहरात दर महिन्याला हजाराच्या जवळपास बेशिस्तांवर कारवाई करण्यात आली आह़े यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होत असून बेशिस्तांनाही शिस्त लागल्याचे सांगण्यात येत आह़े वाहतूक शाखेचे कर्मचारी शहरात वर्षभर तैनात राहून बेशिस्तांवर लक्ष ठेवून असतात़ 
शहरात सम-विषम वाहतूक-गिरीष पाटील
वाहतूक शाखेकडून अवैध प्रवासी वाहनांवरही 11 महिन्यात कारवाई केली होती़ यात एकूण 63 वाहनांवर कारवाई करण्यात येऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होत़े यातील 43 अवैध प्रवासी वाहनधारकांना न्यायालयाने 21 हजार 500, दोन वाहनधारकांना 1400, तीन वाहनधारकांना 15 हजार, 11 वाहनांना 16 हजर 500 रूपयांचा दंड देत कारवाई केली होती़ या सर्व वाहनमालकांनी रक्कम भरल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली़ याबाबत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीष पाटील यांच्यासोबत संपर्क केला असता, त्यांनी सांगितल की, लोकांनी आधी वाहतूकीच्या बाबत स्वयंशिस्त पाळायला हवी, शहरात रस्ते अरूंद असून वाहने वाढली आहेत़ यावर योग्य त्या उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न आह़े पुढील काळात समविषम वाहतूकीसह पार्किगसाठी जास्तीत जास्त जागा वाहनधारकांना कशी मिळवून देता, येईल याबाबत प्रयत्न सुरू आह़े यासाठी मंगळबाजार आणि इतर वाहनधारकांसोबत बैठक घेऊन चर्चाही करण्यात आली आह़े वाहतूक शाखेकडून शहरातील विविध भागात नियुक्त करण्यात आलेले दोन अधिकारी व 35 कर्मचारी यांच्याकडून सातत्याने शहरातील विविध भागात बेशिस्तांवर कारवाई करण्यात आली होती़ दुचाकीवर दोनपेक्षा अधिक, प्रवेश नसलेल्या रस्त्यात वाहन चालवणे, विनापरवाना, विना कागदपत्रे, मोटारसायकलीवर क्रमांक नसणे, मोबाईलवर बोलणे, रस्त्यात उभे राहणे यासह गुजरात व मध्यप्रदेशातून येणा:या दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली होती़ या वाहनधारकांकडून चौकाचौकांमध्ये तैनात करण्यात आलेल्या कर्मचा:यांनी तात्काळ दंड वसूली करत त्यांना मेमो दिल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आह़े 
नंदुरबार शहरात दिवसेंदिवस वाढणा:या बेशिस्तीच्या घटनांवर वचक बसवण्यासाठी वाहतूक शाखेकडून महत्त्वाच्या चार ते पाच चौकांमध्ये काही अंशी जागा मोकळी करून रूंदीकरण मोहिम सुरू करण्यात येणार आह़े यासाठी नगरपालिका प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली असून येत्या काळात चौक मोकळे करण्याची कारवाई सुरू होणार आह़े यासोबत शहरातील नेहरू चौक आणि धुळे चौफुली या दोन ठिकाणी सिगAल व्यवस्था करण्याची तयारी पोलीस प्रशासन करत आह़े यासाठी पालिका प्रशासनाकडे प्रस्ताव देण्यात आला असून प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतरही ठिकाणी सिगAल कार्यान्वित होणार आहेत़ 
 

Web Title: In the city of Nandurbar 8 thousand cases of census in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.