गावे पाणीदार करण्यासाठी शहाद्यातील ग्रामस्थ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:05 PM2018-03-26T12:05:23+5:302018-03-26T12:05:23+5:30

शहादा तालुका : 26 गावांतील ग्रामस्थांना प्रशिक्षण, महिलांचा लक्षणीय सहभाग

The city of Shahada will be ready to clean the villages | गावे पाणीदार करण्यासाठी शहाद्यातील ग्रामस्थ सज्ज

गावे पाणीदार करण्यासाठी शहाद्यातील ग्रामस्थ सज्ज

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 26 : तालुक्यातील गावे पाणीदार करण्यासाठी सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थ गावपातळीवर पाण्याचा प्रत्येक थेंब जिरविण्यासाठी सज्ज होत आहेत. तालुक्यातील 26 गावातील लोकांनी पाणी फाऊंडेशनतर्फर्ेे दिले जाणारे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन गावात प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे. दरम्यान, या उपक्रमांतर्गत गावाच्या विकासासाठी महिलांचा सहभाग वाढत आहे.
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशन काम करीत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून पाणी फाऊंडेशनने काम उभे केले आहे. शहादा तालुक्यातील 60 गावांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. पैकी 10 गावांनी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणा:या प्रशिक्षणाकडे पाठ फिरवल्याने असलोद, उधळोद, कहाटूळ, काकर्दा दिगर, चिखली बुद्रुक, पिंपर्डे, लोंढरे, सावखेडा, सावळदा व हिंगणी ही 10 गावे या स्पर्धेतून बाद झाली आहेत. आवगे, ओझर्टा, कमरावद, कवठळ, कवळीथ, कुकावल, कोंढावळ, कोठली त.सा., खेडदिगर, गोगापूर, चिखली खुर्द, चिरखान, जाम, जुनवणे, नवलपूर, पळसवाडा, बिलाडी त.सा.,  बिलाडी त.ह., मलगाव, वडाळी, वाडी, श्रीखेड, सोनवद त.श. व वडगाव या 24 गावांचे प्रशिक्षण अजून बाकी आहे. अनरद, गोदीपूर, धांदरे बुद्रुक, ब्राrाणपुरी, मंदाणे, मोहिदे त.श., मोहिदे त.ह., शोभानगर, होळगुजरी, चांदसैली, तिधारे, दामळदा, दोंदवाडा, नवानगर, निंभोरा, बामखेडा त.त., बोराळे, भुलाणे, भोंगरा, मातकुट, मानमोडय़ा, लंगडी भवानी, लक्कडकोट, शहाणा, सुलतानपूर व दुधखेडा या 24 गावांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने या  गावांमध्ये विविध कामांना सुरुवात झाली आहे.
अनेक गावांमध्ये वॉटरकप स्पर्धेबाबत रॅली, ग्रामसभेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. लंगडीभवानी येथे पर्यावरण बचावसाठी ढोल वाजवत व विविध घोषणा देत रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप ग्रामसभेत करण्यात आला. या वेळी सुमारे 500 ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच राजेंद्र पावरा, रवींद्र पावरा, शर्मिला पावरा, रमेश पावरा यांनी गावक:यांचे स्वागत केले. बोराळे येथेदेखील ग्रामसभा होऊन वॉटरकप स्पर्धेबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. स्पर्धेपूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून वृक्षारोपण, शोषखड्डे, रोपवाटिका, माती  परीक्षण या कामांना जोरात सुरुवात झाली आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही गाव विकासासाठी पदर खोचल्याने महिलांचा सहभाग वाढत आहे.
 

Web Title: The city of Shahada will be ready to clean the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.