सिव्हीलला मिळाले हाय फ्लो कॅन्यूला मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:41 PM2020-10-09T12:41:44+5:302020-10-09T12:41:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना उपचारात व्हेंटीलेटरला जोडण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाला एनएसई फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून १० हाय फ्लो ...

Civil got a high flow cannula machine | सिव्हीलला मिळाले हाय फ्लो कॅन्यूला मशीन

सिव्हीलला मिळाले हाय फ्लो कॅन्यूला मशीन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना उपचारात व्हेंटीलेटरला जोडण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाला एनएसई फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून १० हाय फ्लो नेझल कॅन्युला मशिन (एचएफएनसी) प्राप्त झाले आहेत.
कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या रुग्णांना आॅक्सिजनची अधिक प्रमाणात आवश्यकता असते. अशावेळी व्हेंटीलेटर्सद्वारे मिळणारा आॅक्सिजनही कमी पडू शकतो. व्हेंटीलेटरला एचएफएनसी जोडल्याने आॅक्सिजनचा प्रवाह अधिक प्रमाणात होतो व रुग्णाला वेळेवर आॅक्सिजन मिळाल्याने त्याचे प्राणदेखील वाचविता येतात. जिल्हा शासकीय रुग्णालीयात पीएम केअर फंडातून प्राप्त झालेल्या ४८ व्हेंटीलेटर्ससाठी ही सुविधा होती. रुग्णालयातील इतर १० व्हेंटीलेटर्ससाठी एनएसई फाऊंडेशनने एका संयंत्रासाठी चार लाख ३१ हजार याप्रमाणे ४३ लाख रुपये किंमतीचे एचएफएनसी उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हा रुग्णालयात कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी पूर्ण क्षमतेच्या ५८ व्हेंटीलेटर्सची सुविधा झाल्याने त्याचा रुग्णांच्या उपचारासाठी चांगला उपयोग होणार आहे.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीसक डॉ. कांताराव सातपूते , डॉ.राजेश वसावे, डॉ.राहूल वसावे , तसेच डॉ.मनिषा पाटील यांना मशिनचे प्रात्यिक्षक करून दाखविण्यात आले. आयसँप संस्थेकडून प्रकल्प समर्थचे प्रमुख शैबल चॅर्टजी यांचे मार्गदर्शन लाभले असून, या कार्यक्रमाला प्रकल्प समर्थ चे जिल्हा व्यवस्थापक परशूराम आंबरे, डॉ.राजेंद्र आगळे तसेच प्रकल्पाचे तालुका समन्वयक बाळासाहेब घुले, विशाल घरटे, हरिष मोरे, दिनेश पावरा यांनी कार्यक्रामासाठी मेहनत घेतली.

Web Title: Civil got a high flow cannula machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.