किरकोळ वादातून गडद येथे दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 05:02 PM2019-06-28T17:02:12+5:302019-06-28T17:02:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील गडद येथे किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील गडद येथे किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती़ दोन्ही गटांनी बुधवारी परस्पविरोधी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आह़े
दिनकर पातळ्या गावीत रा़ गडद व कमलेश दस:या गावीत रा़ लक्कडकोट ता़ नवापुर या दोघांमध्ये मंगळवारी सायंकाळी वाद झाला होता़ कमलेश गावीत यांनी दिनकर गावीत यांना त्यांची मुलगी घरी आली नसल्याने दिनकर गावीत यांना विचारणा करत होत़े यातून दोघांमध्ये वाद वाढला़ यातून दोन्ही गटातील मंडळी समोरासमोर येऊन हाणामारी झाली़ याबाबत कमलेश गावीत यांनी नवापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दिनकर गावीत, फुलसिंग कोटवाल व त्याची पत्नी, प्रमिलाबाई लखू, योहान सतीष गावीत यांच्यासह इतर आठ ते दहा जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली़ तसेच महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील बुटी गर्दीत पाडून नुकसान केल्याचा दाखल आह़े
दिनकर पातळ्या गावीत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इलेश गावीत, बुध्या गावीत, कमलेश गावीत, नितीन गावीत, सावित्रीबाई गावीत, अरविंद गावीत यांच्यासह आठ ते दहा जणांनी गडद गावात फुलसिंग कोटवाल यांच्या अंगणात दिनकर गावीत यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांना मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याने संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़