मौलानांना पगार देण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी, १२ जण जखमी
By मनोज शेलार | Published: September 16, 2023 06:33 PM2023-09-16T18:33:04+5:302023-09-16T18:34:03+5:30
मशिदीतील मौलाना शोएब रजा नुरी बंगाली यांना कार्यमुक्त केल्यानंतर, त्यांना १० महिन्यांचा पगार द्यावा, यावरून दोन गट समोरासमोर आले.
नंदुरबार : येथील जामा मशिदीतील मौलानांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांना १० महिन्यांचा पगार द्यावा, या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी तळोदा येथे घडली होती. यात १२ जण जखमी झाले असून, रात्री उशिरा परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत.
पोलिस सूत्रांनुसार, तळोदा येथील जामा मशिदीतील मौलाना शोएब रजा नुरी बंगाली यांना कार्यमुक्त केल्यानंतर, त्यांना १० महिन्यांचा पगार द्यावा, यावरून दोन गट समोरासमोर आले. दोन्ही गटांनी हातात लाकडी दांडके, काठ्या घेऊन एकमेकांवर चाल केली. हाणामारीत १२ जण जखमी झाले. त्यात शेख रूऊफ नुरा, शेख जहीर शेर, शेख अदनान शेख अरीफ, शेख अफताफ, इम्रान लियाकत शेख, शेख, शरिफ शेख सरदार, शेख सुलतान शेख शरीफ, शेख साजीद शेख सरदार, अफजल शेख हारून, तन्वीर शेख शरीफ, सैयवाद शेख शरीफ, तौफीक शेख शरीफ सर्व रा.नुरानी चौक, तळोदा यांचा समावेश आहे.
याबाबत इम्रान लियाकत शेख व शेख नासिर शेख हारून यांनी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्याने, २५ ते ३० जणांविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल झाला. तपास फौजदार महेश निकम व सागर गाडीलोहार करीत आहेत.