वर्ग पाच खोल्या मात्र तीनच : कोचरा जि.प. शाळेची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:40 PM2018-02-20T12:40:01+5:302018-02-20T12:40:07+5:30

Class five rooms, only three: Cochra zip. School Status | वर्ग पाच खोल्या मात्र तीनच : कोचरा जि.प. शाळेची स्थिती

वर्ग पाच खोल्या मात्र तीनच : कोचरा जि.प. शाळेची स्थिती

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रा१ाणपुरी : राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा डिजिटल केल्या जात असताना शहादा तालुक्यातील कोचरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व्हरांडय़ात बसून विद्याथ्र्याचा शिक्षण घ्यावे लागत आहे. या शाळेत अजून दोन वर्गखोल्या बांधण्याची गरज असून जि.प. प्रशासन व शिक्षण विभागाने या समस्येकडे लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोचरा येथील जि.प. शाळेत पहिली ते पाचवीर्पयत शिक्षणाची सोय असून या पाचही वर्गात 157 विद्यार्थी संख्या आहे. मात्र शाळेत विद्याथ्र्याना बसण्यासाठी केवळ तीनच वर्गखोल्या असल्याने त्यात दाटीवाटीने विद्यार्थी बसतात तर दोन वर्गातील विद्यार्थी व्हरांडय़ात बसून ज्ञानार्जन करतात. एकीकडे राज्य शासन कमी पटसंख्यचे कारण पुढे करून शाळा बंद करीत आहे तर दुसरीकडे पुरेशी पटसंख्या असूनही ग्रामीण विद्याथ्र्याना वर्गखोलीसारखी मूलभूत सुविधा पुरविण्याकरिता प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यावरून शासन व प्रशासन ग्रामीण विद्याथ्र्याबाबत किती गंभीर आहे हे स्पष्ट होते. या शाळेला संरक्षक भिंत नसल्याने याठिकाणी मोकाट जनावरांचा नेहमी वावर असतो.
या जिल्हा परिषद मराठी शाळेसाठी तीन वर्गखोलींचे बांधकाम करण्यात आले. मात्र दोन वर्गातील विद्याथ्र्याना व्हरांडय़ात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. म्हणून या शाळेला अजून दोन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्याची मागणी स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती व केंद्रप्रमुख यांनी वरिष्ठ स्तरावर केली आहे. परंतु प्राथमिक शिक्षण विभाग व जि.प. प्रशासनाचे या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Class five rooms, only three: Cochra zip. School Status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.