स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत नंदुरबार आणि शहाद्यात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:28 PM2019-10-04T12:28:58+5:302019-10-04T12:29:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/नंदुरबार : स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत नगरपालिकांच्या भरारी पथकाने नंदुरबार आणि शहादा येथे धाडी टाकत ...

Cleanliness is an activity in Nandurbar and Martyrs | स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत नंदुरबार आणि शहाद्यात कारवाई

स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत नंदुरबार आणि शहाद्यात कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा/नंदुरबार : स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत नगरपालिकांच्या भरारी पथकाने नंदुरबार आणि शहादा येथे धाडी टाकत प्लास्टिक पिशव्य जप्तीची कारवाई केली़ शहाद्यात 1 हजार तर नंदुरबारात 100 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत़   
शहादा शहरातील न्यू ज्योती प्लास्टिक या दुकानात बंदी असलेल्या प्लास्टिकचा साठा असल्याची माहिती पालिकेच्या पथकाला मिळाली होती़ मुख्याधिकारी डॉ़ राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात पथकाने धाड टाकली असता, तेथून बंदी असलेल्या कॅरीबॅग व इतर प्लास्टिक असे एक हजार किलोग्रॅमचे साहित्य मिळून आल़े याप्रकरणी पथकाकडून दुकानमालक संगीत गुलाणी यास पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आह़े 
ही कारवाई आऱएम़ चव्हाण, माधवराव गुजर, कर निरीक्षक सचिन महाडिक, गोटूलाल तावडे, स्वपAील पाटील, स्वच्छता कर्मचारी केदार, सोलंकी, शंकर वाघ, राकेश सोलंकी, चंद्रकांत संसारे, गणेश मोरे, दिपक सोलंकी, रविंद्र गुजराथी यांच्या पथकाने ही कारवाई केली आह़े 
नंदुरबार पालिका आरोग्य विभागाचे नोडल ऑफिसर विशाल कांबळी, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ़ राजेश परदेशी, शहर समन्वयक सायली बाविस्कर यांनी शहरातील दोन व्यापा:यांवर कारवाई करत 10 हजार दंड व 100 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या़ 
नंदुरबार, नवापुर, शहादा आणि तळोदा तसेच धडगाव येथील नगरपंचायत हद्दीत केंद्र शासनाच्या वने पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या सूचनेनुसार प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रुल लागू करण्यात आला आह़े यांतर्गत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम 11 सप्टेंबरपासून सुरु आह़े यात शुक्रवार 4 सप्टेंबर्पयत प्लास्टिक गोळा करण्यात येणार आह़े पालिकांकडून प्लास्टिक बंदीच्या अमंलबजाणीसाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आह़े 
 

Web Title: Cleanliness is an activity in Nandurbar and Martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.