हवामानातील बदलांमुळे रब्बी पेरण्यांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:25 PM2019-12-06T12:25:56+5:302019-12-06T12:26:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतीवृष्टी आणि अवकाळी पाऊस यातून झालेल्या नुकसानीच्या गर्तेतून शेतकरी बाहेर आले आले असले तरीही ...

Climate change impacts sowing rabbis | हवामानातील बदलांमुळे रब्बी पेरण्यांवर परिणाम

हवामानातील बदलांमुळे रब्बी पेरण्यांवर परिणाम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अतीवृष्टी आणि अवकाळी पाऊस यातून झालेल्या नुकसानीच्या गर्तेतून शेतकरी बाहेर आले आले असले तरीही हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे जिल्ह्यातील रब्बी पेरण्यांची गती संथ झाली आहे़ परिणामी डिसेंबर उजाडूनही जिल्ह्यात केवळ १० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे़
यंदाच्या रब्बी हंगामात सरासरी ६४ हजार हेक्टरवर गहू, हरभरासह इतर रब्बी पिके पेरणी करण्याचे निर्धारित करण्यात आले होते़ यात हरभरा पेरणी जागोजागी सुरु असली तरी गहू, ज्वारी, मका या पिकांच्या पेरण्या अद्यापही शिल्लक असल्याचे दिसून आले आहे़ शेतकऱ्यांना यंदा बियाणे व खते विनासायस उपलब्ध झाले असले तरी अतीवृष्टीमुळे हंगाम लांबल्याने रब्बीच्या पेरण्या होऊ शकलेले नाहीत़ बºयाच ठिकाणी कापूस अद्यापही शेतात असल्याने शेतकºयांना इतर पिकांची पेरणी करता आलेली नाही़ किमान १ महिना कापूस शेतात राहणार असल्याने रब्बी हंगामही यंदा लांबवणीवर पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक रब्बी पेरणी क्षेत्र निर्धारित असलेल्या शहादा तालुक्यात अद्याप २६ टक्के पिकांची पेरणी झाली असून यात गहू आणि हरभरा या दोन पिकांना शेतकºयांनी पसंती दिली आहे़

जिल्ह्यात आजअखेरीस १० हजार ६३० हेक्टर क्षेत्रात रब्बी पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ यात नंदुरबार तालुक्यात १ हजार ५०२, नवापुर तालुक्यात १ हजार ८६३, अक्कलकुवा ५५७, तळोदा ९५२, धडगाव ४३१ तर सर्वाधिक ६ हजार ३२६ हेक्टर शहादा तालुक्यात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ कापूस वेचणी आणि विक्री यात बराच वेळ जात असल्याने शेतकºयांना रब्बी पेरण्यांसाठी वेळच मिळालेला नसल्याने या पेरण्या लांबल्याचे सांगण्यात येत आहे़ यातही नंदुरबार तालुक्यात ७७१ हेक्टर, नवापुर १७६, अक्कलकुवा २०१, शहादा १ हजार १७०, तळोदा १२७ तर धडगाव तालुक्यात १२४ हेक्टरवर गहू पेरा उरकण्यात आला आहे़ अतीवृष्टीचा समावेश असला तरी जिल्ह्यात पाऊस हा सरासरीच्या ११९ टक्के कोसळल्याने २१ हजार १२३ हेक्टरवर गहू पेरणी करण्यात येण्याचे निर्धारण होते़ त्यापैकी अद्याप केवळ २ हजार ५७५ हेक्टरवरच गहू पेरणी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातून यंदा किमान ९० टक्क्यांपर्यंत गहू पेरणी होणार असल्याचा अंदाज शेतकºयांचा आहे़ पाण्याची उपलब्ध असली तरी हंगामादरम्यान हवामानात बदल होऊन नुकसानीची भिती असल्याने अनेक शेतकरी इतर पिकांचा आधार घेत आहेत़

जिल्ह्यात गहू पाठोपाठ हरभरा पिकावर शेतकºयांचा सर्वाधिक भरवसा आहे़ यंदाच्या हंगामात २० हजार ४०४ हेक्टरवर हरभरा पेरणी होण्याचा अंदाज आहे़ यातही शेतकºयांनी नोव्हेंबरपासून पेरण्यांना वेग दिल्याने जिल्ह्यात ३ हजार ८८७ हेक्टरपर्यंत हरभरा पेरणी पूर्ण झाली आहे़ सर्वाधिक १ हजार ७३६ हेक्टर हरभरा शहादा तालुक्यात आहे़ पाण्याच्या उपलब्धतेमुळे आगामी दिवसात हरभरा पेरण्यांना वेग येणार आहे़ यातून १०० टक्क्यांपेक्षा अधिक हरभरा पेरणी पूर्ण करण्यात येणार आहे़ एकीकडे रब्बी कडधान्य आणि धान्य पिकांना महत्त्व असताना करडई, जवस, तीळ, सूर्यफूल ही तेलबिया पिके जवळपास हद्दपार झाल्याचे चित्र शेतीक्षेत्रात आहे़ जिल्ह्यात फक्त १८ हेक्टरवर मोहरीची पेरणी करण्यात आली आहे़

Web Title: Climate change impacts sowing rabbis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.