भराव खचल्याने आहवा मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:41 PM2019-08-06T12:41:18+5:302019-08-06T12:41:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापुरात संततधार पावसाचा जोर आज ओसरला असला तरी पावसाची दहशत मात्र कायम आहे. उकाळापाणीजवळ ...

Closing the Ahwah route due to loads of filler | भराव खचल्याने आहवा मार्ग बंद

भराव खचल्याने आहवा मार्ग बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : नवापुरात संततधार पावसाचा जोर आज ओसरला असला तरी पावसाची दहशत मात्र कायम आहे. उकाळापाणीजवळ रस्त्याचा भराव खचल्याने आहवामार्गे गुजरातमधील वाहतूक ठप्प झाली आहे तर खोकसा प्रकल्पास गळती लागल्याने धरण फुटीची भीती कायम आहे. 
गेल्या तीन दिवसापांसून तालुका संततधार पावसाने जलमय झाला होता. रविवारी एकाच दिवसात 328 मिलीमीटर असा विक्रमी पाऊस पडला. रंगावली नदीवरील पुलावरुन व प्रतापपूर येथील पुलावरील वाहतूक   सोमवारी सुरळीत झाली.  नगराध्यक्षा हेमलता पाटील, तहसीलदार सुनिता ज:हाड, नायब तहसीलदार राजेंद्र नजन, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी रंगावली नदीकिनारी असलेल्या वस्त्यांमधे पाहणी केली. नदीकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांमधे आजही भीती पहावयास मिळाली.
सोमवारी परिवहन सेवा पूर्ववत झाल्याने शहरात वर्दळ दिसून आली. आहवाकडे जाणा:या राज्य मार्गावर उकाळापाणी या जंगल क्षेत्रात रस्त्याचा भराव खचल्याने आहवाकडे वाहनांची ये-जा बंद झाली. नवापूर आहवा राज्यमार्ग पूर्णत: बंद झाला. भरडू येथील नागन प्रकल्प भरला असून प्रकल्पाच्या चारपैकी एक दरवाजा खुला करुन पाणी सोडण्यात आले.  धरणाखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.    
दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी दुपारी रंगावली नदीवरील नयीहोंडा भागातील पुलाजवळून पुराच्या पाण्यात  वाहून गेलेल्या शकुर शेख चांद काकर या 55 वर्षीय अपंग वृद्धाचा मृतदेह गुजरातमधील वंजारी गावाजवळील उकाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मिळून आला. 
बोरपाडा गावाजवळील खोकसा येथील प्रकल्पाच्या मुख्य भिंतीवर भगदाड असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने धरणफुटीची भीती व्यक्त होत आहे. धरण फुटल्याची अफवा रविवारीच पसरली होती. विसरवाडी येथील सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी रविवारी सायंकाळीच खोकसा येथे जाऊन प्रकल्पाची पाहणी केली. संबंधित विभागाचे तज्ञ व अधिकारी नसल्याने त्यांनी दिलेल्या भेटीबाबत तहसीलदार यांना अवगत करुन दिले. गेल्यावर्षीही असाच प्रकार घडला होता. खोकसा प्रकल्पाचे पाणी नागङिारी प्रकल्पात येते. नागङिारी प्रकल्प आधीच पूर्णत: भरला आहे. त्यातच खोकश्याचे पाणी नागङिारी प्रकल्पात आल्यास मोठा अनर्थ घडेल. नागङिारी ते नवापूरदरम्यान असलेल्या अनेक गावांना त्याची झळ बसेल, अशी स्थिती असल्याने खोकसा धरण फुटीच्या अफवा व शक्यतेबाबत संबंधित विभागाने सजग राहून वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
 

Web Title: Closing the Ahwah route due to loads of filler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.