संक्रमणामुळे ढगाळ हवामानाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 05:58 PM2019-01-21T17:58:18+5:302019-01-21T17:58:32+5:30
रब्बीला फटका : थंड व बाष्पयुक्त वा:यांचा परस्पर विरोधी प्रभाव
नंदुरबार : उत्तरेकडून येणारे थंड वारे व दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्यात द्रोणीय भागाची निर्मिती होऊन परिणामी निर्माण झालेल्या संक्रमणामुळे 28 ते 30 जानेवारीदरम्यान उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता वर्तविण्यात येत आह़े
बंगालच्या उपसागरात ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ निर्माण झाल्याने दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे वाहत आहेत़ त्याच वेळी उत्तरेकडूनही थंड वारे दक्षिणेकडे वाहत आहेत़ यामुळे थंड व गरम (बाष्पयुक्त) वारे ज्या प्रदेशात एकमेकांना आदळतील त्या ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आह़े सध्या असे वातावरण प्रामुख्याने विदर्भात निर्माण झाले असून अद्यापतरी उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा धोका नसल्याचे हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे व पुणे येथील हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आह़े
सध्या विदर्भातील काही भाग वगळता उर्वरीत महाराष्ट्रात थंडीची लाट हळुहळु ओसरत आह़े थंडीच्या परतीच्या प्रवासात अनेक वेळा ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ निर्माण होत असतो़ दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे उलटय़ा दिशेने वाहत असल्याने या सर्व वातावरणीय बदलांना संक्रमणाचा कालावधी म्हटला जात असतो़ अनेक वेळा यामुळे काही भागात तुरळक पावसाची शक्यताही वर्तविण्यात येत असत़े तथापि बहुतेक वेळा अशी स्थिती निर्माण होत असते, परंतु यातून अवकाळी पाऊस पडतोच असे नसल्याचे मत हवामानतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आह़े सध्या विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात थंडी ओसरताना दिसून येत आह़े जानेवारीनंतर ब:यापैकी किमान तापमानात वाढ होणार आह़े दरम्यान, सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका नसला तरी वातावणीय बदलामुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत़ तसेच उत्तरेकडील प्रदेशांमध्ये अद्यापही कमी अधिक प्रमाणात हिमवृष्टी होत असल्याने तेथूनही थंड वारे वाहत आहेत़
खान्देशसह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने याचा रब्बी पिकांवर काय परिणाम होणार याबाबत धुळे येथील कृषी विभागाचे कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉ़ मुरलीधर महाजन यांना बोलते केले असता ते म्हणाले, सलग तीन ते चार दिवस ढगाळ हवामान राहिल्यास याचा सर्वाधिक फटका हरभरा पिकाला बसण्याची शक्यता आह़े हरभ:यावर घाटेअळी तर गव्हावर गेरवा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आह़े या दरम्यान पाऊस झाल्यास तो किती प्रमाणात पडतो यावर फायदा व नुकसानीचे गणित अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितल़े तुरळक पाऊस झाल्यास याचा पिकांना फायदा होणार आह़े दरम्यान, नाशिकसारख्या द्राक्षबागायती जिल्ह्यात केवळ ढगाळ वातारवणामुळेच द्राक्षाला मोठय़ा प्रमाणात धोका आह़े