चोरटी मासेमारी तत्काळ बंद व्हावी : सरदार सरोवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:37 PM2018-07-18T12:37:04+5:302018-07-18T12:37:51+5:30

सरदार सरोवर : मच्छिमार संस्थांचे डॉ.अफरोज अहमद यांना साकडे

Clutter fishing should be stopped immediately: Sardar Sarovar | चोरटी मासेमारी तत्काळ बंद व्हावी : सरदार सरोवर

चोरटी मासेमारी तत्काळ बंद व्हावी : सरदार सरोवर

Next

तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पाच्या बॅक वॉटरमध्ये मासेमारी करणा:या प्रकल्पग्रस्तांचा मच्छिमार सहकारी संस्थांना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे डॉ.अफरोज अहमद यांच्या हस्ते शनिवारी मत्स्य बीज वाटप करण्यात आले. 
या वेळी या संस्थांच्या पदाधिका:यांनी येथे मासेमारी बंद असतांना मध्यप्रदेश व गुजरातमधील काही व्यावसायिक चोरटी मासेमारी अन् वाहतूक करीत आहेत. त्यांचा तत्काळ बंदोबस्त करून कायदेशीर कारवाई करावी. याशिवाय जेथे मासेमारी केली जाते तेथील पाण्यात मोठय़ा प्रमाणात झाडे वाढली आहेत. ती अडथळा ठरत असल्याने तातडीने तोडण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.
नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे संचालक डॉ.अफरोज अहमद यांनी शनिवारी नर्मदा काठावरील खर्डी खुर्द येथे मासेमारी केंद्रांना भेट देवून पाहणी केली होती. या वेळी आयुक्त अरूण विंधळे, उपायुक्त सुजाता साळुंखे, सहायक संशोधन अधिकारी  डॉ.विवेक वर्तक, सहायक आयुक्त किरण पाडवी, मत्स्यविकास अधिकारी ई.डी. सैय्यद, व्ही.व्ही. नाईक, व्ही.अ. लहारे, नर्मदा बचाव आंदोलनाचे चेतन साळवे, मच्छिमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी सियाराम पाडवी, नरपत बिज्या वसावे, रोता भोंग्या वळवी, सरदार                  रोनग्या वसावे, देवाज्या रामसिंग पावरा आदी उपस्थित होते. या वेळी विस्थापितांचा मच्छिमार सहकारी संस्थांचा पदाधिका:यांनी प्राधिकरणाचे डॉ.अफरोज यांच्यापुढे अनेक समस्या मांडल्यात. शासनाने प्रकल्पग्रस्तांसाठी मच्छिमार व्यवसाय उपलब्ध करून दिला असला तरी येथे मोठय़ा प्रमाणात गुजरात व मध्यप्रदेशमार्गे काही व्यावसायिक बेकायदेशीरपणे मासेमारी बरोबरच चोरटी वाहतूक करीत आहेत. याप्रकरणी अनेक वेळा तक्रारी करूनही त्यांचा बंदोबस्त होत नसल्याची व्यथाही त्यांनी अहमद यांच्यापुढे मांडली. 
वास्तविक जून ते ऑगस्ट पावेतो म्हणजे अडीच महिन्यापावेतो येथे मासेमारी करण्यास बंदी असतांना हे व्यावसायिक सर्रास चोरटी वाहतूक कसे करतात असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर ज्या           बॅक वॉटरमध्ये मासेमारी केली जाते तेथेही झाडे-झुडपे मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. ही झाडे तोडणे      अपेक्षीत आहे. कारण मासे  पकडतांना येथे जाळ्या फाटत असतात. त्यामुळे आम्हा संस्थांचे             मोठे नुकसान होत असते. मासेमारीसाठी नडणारी ही सर्व झाडे झुडपे तातडीने तोडण्यात यावी,       अशी मागणीही या पदाधिका:यांनी केली. 
डॉ.अहमद यांनी पदाधिका:यांच्या समस्या ऐकून चोरटी मासेमारी, वाहतुकीबाबत गुजरात व मध्यप्रदेश येथील संबंधित अधिका:यांची बैठक घेवून त्यावर ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय झाडे-झुडपे तातडीने तोडण्याच्या सूचना संबंधित अधिका:यांना दिल्या. या वेळी त्यांनी संस्थांना पुरविण्यात आलेल्या पिंजरे व इतर साहित्याची पाहणी करून मासेमारी व्यवसायाचा भरभराटीसाठी मत्स्य बीजांची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी सभासदांना केले.
 

Web Title: Clutter fishing should be stopped immediately: Sardar Sarovar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.